Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:53:17 hrs

मुख्य पान | अनुसूचित कल्याण समितीवर आदिवासी आमदारांची हरकत
अनुसूचित कल्याण समितीवर आदिवासी आमदारांची हरकत
मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी) (11-March-2010)
Tags : Ahmednagar,Maharashtra
 

- विधिमंडळातील अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने बिगर आदिवासी सदस्याची नेमणूक केली असून, या नेमणुकीस आदिवासी आमदारांनी हरकत घेतली आहे. विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव पाटील यांनी विधिमंडळातील तीस विविध समित्यांवरील नेमणुकांची घोषणा केली. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ. सुरेश धस यांची नेमणूक आदिवासी समितीच्या अध्यक्षपदी करण्यात आली. मात्र धस हे मराठा समाजातील असून आदिवासी मंत्री म्हणूनही राष्ट्रवादीचे बिगर आदिवासी व मराठा नेते बबनराव पाचपुते यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. या संदर्भात आदिवासी आमदारांमध्ये नाराजी असतानाच आता विधिमंडळ समितीचे अध्यक्षपदही बिगर आदिवासी आमदारांकडे देण्यात आले. याबद्दल आदिवासी आमदारांत अस्वस्थता पसरली आहे. राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांनी तर भर सभेत निषेध नोंदविला. हे आमदार आता विधानसभाध्यक्ष व सभापतींकडेही आपले गार्‍हाणे मांडणार आहेत. विधिमंडळातील लेखा समिती या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांची नियु्नती झाली आहे.


प्रिंट काढा