Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:43:44 hrs

मुख्य पान | रमेशचा मृत्यू मानेवर पाय पडल्याने
रमेशचा मृत्यू मानेवर पाय पडल्याने
मुंबई, दि.10 (प्रतिनिधी) (11-March-2010)
Tags : Ahmednagar,Crime,Maharashtra
 

- कालिना येथे पोलिस भरतीच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत मरण पावलेल्या रमेश आंबारे याचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून, मानेवर पाय पडल्याने श्वास गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दिली. मुंबई पोलिस दलात 3 हजार 586 पोलिस शिपायांच्या पदांच्या भरती प्रक्रियेला कालपासून सुरूवात झाली. कालिना येथील पोलिस मैदानावर या भरतीसाठीचे अर्ज सादर करण्याच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत रमेशचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिस भरतीतील नियोजनाचा अभाव पुढे आला. रमेशचा मृतदेह काल सायंकाळी उशिरा शेतकरी असलेल्या त्याच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट करणारा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून, मानेवर तसेच गळ्यावर पाय पडल्याने श्वास कोंडल्याने त्याचा मृत्यू झाला. पाठीच्या मणक्याला झालेली गंभीर इजादेखील त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. रमेश गेल्या दीड वर्षापासून पोलिस दलात भरती होण्यासाठी प्रयत्न करीत होता. तो शिर्डी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दुसर्‍या वर्षात शिकत होता, अशी माहिती परिमंडळ -8 चे पोलिस उपायुक्त ब्रिजेश सिंग यांनी दिली.


प्रिंट काढा