Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:18:05 hrs

मुख्य पान | दिल्लीगेट येथील ‘नम्रता कले्नशन’ दुकान भुईसपाट
दिल्लीगेट येथील ‘नम्रता कले्नशन’ दुकान भुईसपाट
अहमदनगर, दि. 10 (प्रतिनिधी)- (11-March-2010)
Tags : Ahmednagar,Crime,Regional
 

जागा खाली करण्यासाठी नगरसेवक श्रीकांत छिंदम यांच्या दबावाला न जुमानल्यामुळे काल (मंगळवार) रात्री दिल्लीगेट येथील नम्रता कले्नशन भुईसपाट केल्याची घटना घडली. नम्रता कले्नशनमधील मशिनरींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हे नुकसान करणार्‍या छिंदम यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी सकाळी दिल्लीगेट येथे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, नगर शहरात दहशत पसरविणार्‍यांची गय करू नये अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आमदार अनिल राठोड यांनी दिला आहे. दिल्लीगेट येथील मोहनबाग येथे सुरेश व चंद्रकांत कोडम यांची जागा आहे. या जागेत नम्रता कले्नशनसह विविध दुकाने आहेत. ही जागा छिंदम कुटुंबीयांनी घेतली. त्यामुळे या जागेत असलेले गाळे खाली करण्यासाठी नगरसेवक छिंदम यांच्याकडून व्यावसायिकांवर दबाव येत होता. त्यामुळे या परिसरातील अनेकांनी दुकाने खाली केली होती. मात्र, नम्रता कले्नशनचे मालक अजित रिखबचंद चोरडिया, श्याम रिखबचंद चोरडिया हे दुकानाची जागा खाली करत नव्हते. छिंदम यांच्याकडून धम्नया दिल्या जात असल्याबाबत पोलिस अधीक्षक विजय चव्हाण यांचेही लक्ष वेधले होते. परंतु, पोलिसांनी लक्ष दिले नाही. चोरडिया यांनी पोलिसांकडे अर्ज दिल्याने छिंदम यांच्याकडून मंगळवारी रात्री जेसीबीच्या सहाय्याने दुकाने पाडली गेली. यावेळी नम्रता कले्नशनचीही भिंत पडल्याने दुकानाचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे दुकानातील फोटो तयार करण्याची मशीन, फ्ले्नस बोर्ड तयार करण्याची मशीन, संगणक आणि इतर साहित्य असे सुमारे 30 लाखांचे नुकसान झाले. या प्रकारानंतर छिंदम कुटुंब जेसीबी मशीनसह पसार झाले. दुकानातील मशिनी लांबविल्याचाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला. आज बुधवारी सकाळी चोरडिया हे दुकान उघडण्यासाठी आल्यावर दुकानाची भिंत पाडल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी ओरड केली. या घटनेची माहिती त्यांच्या नातेवाईकांना समजताच त्यांनीही दिल्लीगेट येथे गर्दी केली. यावेळी वसंत लोढा यांनी चोरडिया कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती व्यापारी वर्गात पसरताच त्यांनीही दिल्लीगेट येथे गर्दी केली. चोरडिया यांनी दुकानासमोर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. सकाळी परीक्षेची वेळ असल्याने चोरडिया यांनी आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती पोलिसांकडून करण्यात आली. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करून आंदोलन चालूच ठेवल्याने पोलिसांनी अटक करण्याची भूमिका घेतल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. तेव्हा दुकानासमोरच ठिय्या मांडून उपोषण सुरू करण्यात आले. या घटनेची माहिती समजताच आमदार अनिल राठोड यांनी चोरडिया यांच्या दुकानाला भेट देऊन पाहणी केली. नगर शहरात गुंडगिरी वाढली असून ही गुंडगिरी शिवसेना खपवून घेणार नाही, असा इशारा देऊन चोरडिया यांनी लगेचच दुकानाच्या बांधकामाला सुरुवात करावी. त्यांना शिवसेना पूर्ण संरक्षण देईल, असे आमदार राठोड यांनी चोरडिया कुटुंबीयांना सांगितले. यावेळी राठोड यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात जाऊन पोलिस निरीक्षक सुरेश गायधनी यांची भेट घेऊन कायदा व सुव्यवस्था मोडण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी केली. दरम्यान, रीतेश अजित चोरडिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शंकरराव रंगय्या छिंदम, श्रीकांत शंकरराव छिंदम, श्रीपाद शंकरराव छिंदम, रघुनाथ छिंदम, नीलेश छिंदम, ज्योती छिंदम, स्नेहा छिंदम, सुनंदा छिंदम, संजय सिरसूल (सर्व रा. मोहनबाग, दिल्लीगेट, नगर) यांच्याविरुद्ध दुकानातील साहित्यांचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


प्रिंट काढा