Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:40:32 hrs

मुख्य पान | दहावीच्या परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा सुळसुळाट
दहावीच्या परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा सुळसुळाट
भेंडा, दि. 10 (वार्ताहर) (11-March-2010)
Tags : Ahmednagar
 

- सध्या सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षा केंद्रावर होणार्‍या कॉपीला आवर घालण्याची मागणी एकीकडे होत असताना येथील जिजामाता विद्यालयात दहावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा व्यवस्थापनाच्या शिथिल कारभारामुळे राजरोसपणे विद्यार्थी कॉपी करीत आहेत. हुशार विद्यार्थ्यांचे यामुळे नुकसान होत असून, या केंद्राबद्दल पालकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. काही पालकांनी या केंद्र संचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तालु्नयामध्ये एकेकाळी जिजामाता विद्यालयाचे दहावीचे परीक्षा केंद्र शिस्तप्रिय म्हणून ओळखले जात होते. मात्र, केंद्र संचालकांच्या शिथिल कारभारामुळे आणि कॉपीबहाद्दरांच्या त्रासाने या केंद्राचा दर्जा ढासळल्याचे दिसून येत आहे. केंद्र संचालकांकडून केंद्रावर नसणार्‍या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांची तपासणी करण्याचे काम केले जात आहे. कॉपीबहाद्दर येथील शिक्षक, शिपाई आणि नियंत्रण ठेवणार्‍या शासकीय अधिकार्‍यांना दमबाजी करून वर्गाबाहेरून काही विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत आहेत. या कॉपीबहाद्दरांवर कडक कारवाई करण्याची मागणी पालकांमधून होत आहे.


प्रिंट काढा