Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:18:59 hrs

मुख्य पान | नगरपालिकांचे आरक्षण जाहीर
नगरपालिकांचे आरक्षण जाहीर
मुंबई, दि. 9 (प्रतिनिधी) (10-March-2010)
Tags : Ahmednagar,Regional,Political,Maharashtra
 

- नगरविकास विभागाने मंगळवारी राज्यातील 226 नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर केले. हे आरक्षण नगरपालिका, नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर लागू होणार आहे. श्रीगोंदा, वणी, श्रीरामपूर, सटाणा, नंदूरबार, अंमळनेर, शिरपूर वरवाडे नगरपरिषदेचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी, तर कोपरगाव (महिला) आणि राहुरी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी शहादा नवापूर, सिन्नर, चाळीसगाव, यावल नगरपरिषदेचे अध्यक्षपद आरक्षित झाले. त्र्यंबक, पारोळा, संगमनेर या नगरपरिषदेला नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी आरक्षित राहतील. मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव, नगरविकास विभागाचे सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. 87 नगरपरिषदांचे अध्यक्षपद हे खुले राहिले आहे.


प्रिंट काढा