|
|
|
|
| मुख्य पान | बारावी अर्थशास्त्र विषयाची उत्तरपत्रिका पळविली |
| बारावी अर्थशास्त्र विषयाची उत्तरपत्रिका पळविली |
|
| अहमदनगर, दि. 9 (प्रतिनिधी)- (10-March-2010) |
Tags : Ahmednagar,Regional,Political,Maharashtra |
बारावीच्या परीक्षेतील अर्थशास्त्राची उत्तर पत्रिका पळवून नेल्याची घटना आज येथील न्यू आर्ट्स महाविद्यालयात घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात रात्री गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. न्यू आर्ट्स महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा बैठकीची व्यवस्था आहे. आज (मंगळवार) अर्थशास्त्राचा पेपर होता. पेपर संपण्याची वेळ येताच सदर परीक्षार्थी उत्तर पत्रिका घेऊन पसार झाला. उत्तर पत्रिका गोळा करण्याची प्रक्रिया सुरू होती, त्यावेळी उत्तरपत्रिका कमी आढळून आल्यावर संबंधित परीक्षार्थीने उत्तरपत्रिका पळवून नेल्याचे निदर्शनास आले. या विद्यार्थ्यांने 17 क्रमांकाचा फॉर्म भरून परीक्षा दिल्याने संबंधित परीक्षार्थीच्या नावाचा उल्लेख झाला नाही. आता उद्या पुणे बोर्डाकडे संपर्क केल्यावर संबंधित परीक्षार्थीचे नाव स्पष्ट होईल. दरम्यान उत्तरपत्रिका पळवून नेणार्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. |
प्रिंट काढा |
|
|
|