- अधिक ऊस उत्पादन व साखर उतारा देणार्या उसाच्या सुधारित जातीची माहिती घेण्यासाठी आलेल्या ऊस उत्पादक शेतकर्यांना कोल्हापूर, सांगलीच्या शेतकर्यांनी ऊस शेतीमधील शिवार पाहणी करताना प्रात्यक्षिकासह उसाचे अधिक उत्पादन कसे मिळवता येईल, याची माहिती देऊन शेतकर्यांमध्ये चैतन्य निर्माण केले.
ऊस संशोधनाच्या शिफारसी व तंत्रज्ञानाचा शेतकर्यांपर्यंत यशस्वी प्रसार व अंमलबजावणी करून ऊस उत्पादकता वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी विभागाने सर्वकष ऊस उत्पादकता वाढ योजना राबवली असून, गतवर्षापासून साखर कारखाने, वसंतदादा साखर संस्था यांच्या सहयोगाने हा महत्त्वाकांक्षी पथदर्शक प्रकल्प हाती घेतला आहे. सहलीतील शेतकर्यांनी वसंतदादा साखर संस्था (मांजरी) येथे भेट दिली. डॉ. रमेश हापसे, डॉ. सुभाष शिंदे यांनी शेतकर्यांना ऊस व्यवस्थापन, सिंचन व्यवस्थापन, उसाच्या विविध जाती याविषयी मार्गदर्शन केले. पाडेगाव येथील शिवारातील उसाच्या विविध जाती शेतकर्यांनी पाहिल्या.
वाळवा तालु्नयातील राजाराम सहकारी साखर कारखान्याला भेट देऊन तेथील व्यवस्थापन व सभासद यांच्यातील दृढ विश्वास समजावून घेतला. साडेचार फुटी ऊस लागवडीतून एकरी 100 टनापेक्षा अधिक ऊस उत्पादन देणार्या विराज शिंदे (आष्टा, ता. वाळवा), त्याचप्रमाणे करंदवाडी (ता. वाळवा) येथील ऊसभूषण पुरस्कार मिळवलेल्या सुरेश अप्पासाहेब कबाडे या शेतकर्यांकडील 48 कांड्या असलेला 86032 हा ऊस शेतकर्यांनी पाहिला. त्याचप्रमाणे सुरू, खोडवा, निडवा या पिकांचे व्यवस्थापन समजावून घेतले. वारणानगर येथील तात्यासाहेब कोटे साखर कारखाना व उद्योगसमूहास शेतकर्यांनी भेट दिली. |