- राष्ट्रवादी कॉंग्रेसची शहर जिल्हा कार्यकारिणी मंगळवारी शहर जिल्हाध्यक्ष अंबादास गारुडकर यांनी जाहीर केली. उपाध्यक्ष, सरचिटणीस व चिटणीस अशा प्रत्येकी सात जणांची नियु्नती करण्यात आली असून विधानसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र अध्यक्षांची नियु्नती करण्यात आल्याने या शहर जिल्हाध्यक्षांना समांतर संघटनाच उभी करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
शहर विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी माजी शहराध्यक्ष नामदेव पवार यांची नियु्नती करण्यात आल्याचे गारुडकर यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शारदा लगड, शहराध्यक्षा जयश्री मांढरे, राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अजय चितळे, खजिनदार डॉ. रणजित सत्रे आदी उपस्थित होते. शहरातील नेत्यांबरोबर चर्चा करून सर्व स्तरांतील कार्यकर्त्यांना या कार्यकारिणीत संधी देण्यात आली आहे. लवकरच शहरातील कार्यकर्त्यांसाठी एकदिवसीय शिबिर आयोजित करण्यात येणार असून प्रभागनिहाय समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे. कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे. उपाध्यक्ष-कुमार नवले, नाथाजी राऊत, ज्ञानेश्वर रासकर, रामचंद्र दिघे, आशाताई भिंंगारदिवे, शशिकला चव्हाण, शरद मडूर. सरचिटणीस-प्रशांत नेटके, अशोक कानडे, शिवाजी साळवे, अरविंद शिंदे, डॉ. अजित फुंदे, अॅड. रवींद्र शितोळे, रावसाहेब बारस्कर. चिटणीस-बजरंग भुतारे, ताजुद्दीन शेख, डॉ. विक्रम लोखंडे, राहुल मोहिरे, संजय लोखंडे, चंद्रकांत शेळके, डॉ. अशोक भोजने. खजिनदार म्हणून डॉ. रणजित सत्रे यांची नियु्नती करण्यात आली आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून नगरसेवक विनीत पाऊलबुुद्धे, शिवाजी कराळे, नामदेव पवार, कासमभाई शेख, प्रमोद गांधी, भाऊसाहेब उडाणशिवे, अतुल भंडारी, भास्कर महाडीक, बबनराव कळमकर, प्रवीण फिरोदिया यांची तर विशेष निमंत्रितांमध्ये माजी जिल्हाध्यक्ष दादा कळमकर, आमदार अरुण जगताप, प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, अशोक बाबर, महापौर संग्राम जगताप, प्रा. मुकुंद घैसास, अॅड. लक्ष्मण वाडेकर, सूर्यकांत खैरे, प्रेमकुमार गिल्डा, संजय सपकाळ, जगन्नाथ निकुंभ, शरद रच्चा, अशोक बोरा, डॉ.अनिल आठरे यांसह सर्व नगरसेवक आणि अन्य सेलचे जिल्हाध्यक्ष याचा समावेश करण्यात आला आहे.
शहर विकासासाठी सर्व पक्षांचे नेते व कार्यकर्त्यांना एकत्रित आणून केंद्र व राज्याकडून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शेलार व गारुडकर यांनी सांगितले. |