Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:49:02 hrs

मुख्य पान | आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य शिबिर
आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य शिबिर
अहमदनगर, दि. 9 (प्रतिनिधी)- (10-March-2010)
Tags : Ahmednagar
 

भगवान महावीर जयंती आणि आनंदऋषिजी यांच्या 18 व्या पुण्यस्मृती दिनानिमित्त येथील आनंदऋषिजी हॉस्पिटल आणि लायन्स ्नलब यांच्या संयु्नत विद्यमाने येत्या 14 मार्च ते 11 एप्रिलपर्यंत विविध मोफत तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. यावेळी सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया आणि चिकित्सा करण्यात येणार आहे. डॉ. संदीप तडस, डॉ. अभिजीत पाठक, डॉ. वसंत कटारिया, डॉ. प्रदीप जैस्वाल, डॉ.प्रवीण डुंगरवाल आदी यावेळी हृदयरोग तपासणी करणार आहेत. दि. 17 मार्चला कॅन्सर तपासणी शिबिर होणार आहे. यामध्ये घसा, फुफ्फुस, आतडे, गर्भाशय आणि तोंडाची तपासणी करण्यात येणार आहे. 18 मार्च रोजी मधुमेह आणि उच्च र्नतदाब, 19 मार्चला पोटाचे विकार आणि हर्नियाचे शस्त्रक्रिया शिबिर होणार आहे. तसेच डोकेदुखी, अर्धशिशी या विकाराची तपासणी करण्यात येणार आहे. 20 मार्चला दंतरोग तपासणी शिबिर होणार आहे. 21 रोजी मेंदू आणि पाठीचा कणा तपासणी शिबिर होणार आहे. 22 ला एम. एस. आर्थो गोल्ड मेडलिस्ट डॉ. प्रशांत पठारे आणि डॉ. दिनेश पाटोळे यांच्या उपस्थितीत अस्थिरोग तपासणी आणि सांधेबदली शिबिर होणार आहे. 24 मार्च रोजी दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया शिबिर होणार आहे. 25 रोजी मधुमेहयु्नत किडनीचे आजार, अंगावर सूज येणे, किडनी प्रत्यारोपणविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 26 रोजी नेत्रतपासणी चिकित्सा शिबिर होईल. 27 मार्चला स्त्रीरोग आणि गर्भवती महिला आरोग्य तपासणी शिबिर, तर 31 मार्चला बालरोग तज्ज्ञ संदीप गायकवाड आणि डॉ. हेमंत नाईक यांच्या उपस्थितीत बालरोग निदान आणि शस्त्रक्रिया शिबिर होणार आहे. 11 एप्रिलला तिरळेपणा आणि नेत्रतपासणी शस्त्रक्रिया शिबिर होणार आहे. या शिबिरात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना प्राधान्य दिले जाणार आहे. यासाठी डॉ. मधुसूदन झंवर, डॉ. राजेश पवार, डॉ. पारस शहा, डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. स्मिता पठारे आणि डॉ. सुवर्णा गोलेचा उपस्थित राहणार आहेत.


प्रिंट काढा