Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:32:17 hrs

मुख्य पान | पाणी योजनेची निविदा 72 ट्नके वाढीव दराने
पाणी योजनेची निविदा 72 ट्नके वाढीव दराने
अहमदनगर, दि. 9 (प्रतिनिधी) (10-March-2010)
Tags : Ahmednagar,Political,Maharashtra
 

- स्थानिक ठेकेदारांची म्नतेदारी मोडीत काढीत शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या आज उघडलेल्या निविदेत मुंबई येथील तापी प्रीस्ट्रेट कंपनीने बाजी मारली. प्रतिभा इंटरप्रायजेस कंपनीच्या तक्रारीवरून तहकूब करण्यात आलेली निविदा प्रक्रिया आज पुन्हा सुरू करण्यात आली असून त्यात सर्वाधिक ठाणे येथील एसएमसी कंपनीने 99 ट्नके तर स्थानिक ए. एस. कोठारी यांनी 73 ट्नके आणि सर्वात कमी तापी संस्थेने 72 टक्के वाढीव दराने निविदा सादर केली. सर्वात कमी दराची तापी संस्थेची निविदा प्रशासनाने दाखल करून घेतली आहे. शहरात सुधारित पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे. केंद्र शासनाकडून या योजनेस 73 कोटी 5 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पहिल्यांदा निविदा प्रसिद्ध केल्यानंतर राज्यभरातील 15 मजूर संस्थांनी अर्ज नेले होते. परंतु, यातील केवळ 6 संस्थाच पात्र ठरल्या. पात्र ठरलेल्यंापैकी केवळ एकानेच मुदतीच्या आत निविदा टाकल्याने स्पर्धा निर्माण होऊ शकली नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पुन्हा निविदा प्रसिद्ध केल्या. निविदा सादर करण्याची अंतिम मुदत 22 मार्च ठेवण्यात आली होती. मात्र, प्रतिभा इंटरप्रायजेस या संस्थेने तक्रार केल्याने निविदा प्रक्रिया स्थगित केली गेली. या तक्रारींत तथ्य नसल्याचे उघड झाल्याने आज महापालिका उपायु्नत अच्युत हांगे, उपायु्नत डॉ. पंकज जावळे, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख परिमल निकम, अभियंता चौघुले आणि विविध मजूर संस्थांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत निविदा उघडण्यात आल्या. त्यात ठाणे येथील एसएमएसी इंफ्रस्ट्र्नचर मजूर संस्था 99 टक्के, नगर येथील ए. एस. कोठारी 73 टक्के आणि तापी संस्थेची 72 टक्के वाढीव दराची निविदा प्राप्त झाली असून यात सर्वात कमी असलेली निविदा प्रशासनाने दाखल करून घेतली आहे. या निविदेचा तौलनिक अभ्यास करून ती स्थायी समितीस सादर केली जाणार आहे. यापूर्वी पहिल्यावेळी निविदा भरण्यास इतर संस्थांना मज्जाव करण्यात आला होता. पहिल्यावेळी एकच निविदा टाकली गेली होती. यामुळे स्पर्धा निर्माण झालीच नाही. त्यामुळे फेरनिविदा काढण्यात आली आणि निविदा सादर करण्याची अंतिम मुदत 22 मार्च ठेवण्यात आली होती. परंतु ऐनवेळी स्थानिक ठेकेदारांकडून इतर संस्थांना निविदा सादर करण्यास मज्जाव करण्यात आला. दरम्यान याच दिवशी मुंबई येथील प्रतिभा इंटरप्रायजेस संस्थेच्या प्रतिनिधीने धाडस करत आपण निविदा भरण्यासाठी महापालिका कार्यालयात मुदतीच्या आधीच हजर होतो. मात्र स्थानिक लोकांनी दमदाटी करत एका खोलीत कोंडून ठेवल्याने निविदा टाकता आली नाही, अशी तक्रार आयु्नत संजय काकडे यांच्याकडे केली होती. ही तक्रार प्राप्त झाल्यामुळे मनपा आयु्नत काकडे यांनी निविदा प्रक्रिया तापुर्ती स्थगित ठेवली होती. मात्र, काल या संदर्भात त्यांनी नगरविकास विभाग कार्यालयात चौकशी केली असता प्रतिभा एंटरप्रायजेसने केलेल्या तक्रारींत काहीही तथ्य नाही. निविदा काढू शकता, असे सांगण्यात आले. नगरविकास विभागाकडून निविदा प्रक्रियेस हिरवा कंदील मिळाल्याने ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सर्वात कमी दराने आलेल्या निविदेेचा अभ्यास करून काम दिले जाणार आहे.


प्रिंट काढा