|
|
|
|
| मुख्य पान | ‘त्या’ पोलिस अधिकारी, कर्मचार्यांच्या बदल्या करा ः गोरे |
| ‘त्या’ पोलिस अधिकारी, कर्मचार्यांच्या बदल्या करा ः गोरे |
|
| मुंबई, दि. 9 (प्रतिनिधी)(10-March-2010) |
Tags : Ahmednagar,Political,Maharashtra |
- आ. विवेक पंडित यांच्या उपोषण स्थळाजवळ वसई येथे आणि निर्मळ-वाघोळी गावात पोलिसांनी केलेल्या लाठीमाराची न्यायालयीन चौकशीची मागणी करतानाच त्या ठिकाणच्या सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचार्यांच्या बदल्या जिल्ह्याबाहेर करा, अशी जोरदार मागणी ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांनी केली.
गेल्या शुक्रवारी आ. पंडित यांना पोलिसांनी बळाचा वापर करून रुग्णालयात दाखल केले आणि त्या कारवाईला विरोध करणार्या नागरिकांवर जोरदार लाठीहल्ला केला. मात्र, केवळ आंदोलन करणार्यांना नव्हे तर घराघरात घुसून लहान मुलांपासून ते 80 वर्षांपर्यंतच्या म्हातारीपर्यंत 100/150 निरपराध नागरिकांना पोलिसांनी फटकारले अशी तक्रार गोरे यांनी केली. यावेळी मनवेल तुस्कानो, पायस मचाडो, वसंत शिराळी, प्रभाकर नारकर आदींनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यापुढे लोकांची कैफीयत मांडली. अनेक महिलांनी हाता-पायावर पडलेले लाठीच्या फट्नयांचे वळ आणि जखमा आबांना दाखवल्या. गृहमंत्री हे पाहून हादरले. त्यांनी कोकण विभागाचे पोलिस महानिरीक्षक परमजीत सिंग यांना चौकशी करून आठ दिवसांच्या आत अहवाल देण्याचे आदेश दिले. न्यायालयीन चौकशीची गरज नाही. मात्र आवश्यकता भासली तर सीआयडी चौकशी करण्याचे आश्र्वासन त्यांनी दिले.
|
प्रिंट काढा |
|
|
|