Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:49:07 hrs

मुख्य पान | महिला शिक्षिकांना सहा महिन्यांची प्रसूति रजा
महिला शिक्षिकांना सहा महिन्यांची प्रसूति रजा
मुंबई, दि. 9 (प्रतिनिधी) (10-March-2010)
Tags : Ahmednagar,Maharashtra
 

- महिला शिक्षक कर्मचार्‍यांना 180 दिवसांची प्रसूति रजा देण्याच्या निर्णयावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले. या निर्णयाचे शिक्षक भारतीचे अध्यक्ष आ. कपिल पाटील यांनी स्वागत केले आहे. महिला शिक्षक कर्मचार्‍यांना सहा महिन्यांची प्रसूति रजा मिळावी, यासाठी शिक्षक भारतीने गेली काही दिवस राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याबाबत अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे या निर्णयातील अर्थ खात्याचा अडसर दूर झाला. या निर्णयाबद्दल पाटील यांनी शालेय शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात, सचिव संजीवकुमार यांचे अभिनंदन केले आहे. शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे पगार दरमहा एक तारखेस राष्ट्रीयकृत बँकेमार्फत करण्याची मागणी मान्य करून अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी दिलासा दिला, अशा शब्दात पाटील यांनी सरकारच्या भूमिकेचे स्वागत केले.


प्रिंट काढा