Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:40:45 hrs

मुख्य पान | पंतप्रधान म्हणाले, शेवट गोड झाला!
पंतप्रधान म्हणाले, शेवट गोड झाला!
नवी दिल्ली, दि. 9 (वृत्तसंस्था)(10-March-2010)
Tags : Ahmednagar,National,Maharashtra
 

- महिला आरक्षण विधेयक म्हणजे महिलांना न्याय देण्याच्या दिशेने टाकलेले ऐतिहासिक पाऊल असल्याचे सांगत हे विधेयक म्हणजे या देशाच्या महान कन्यांना आमचा प्रणाम असल्याचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी सांगितले. गोंधळ झाला तरी शेवट गोड झाला असेही ते म्हणाले. या विधेयकात दलित, अल्पसंख्याक व मागासवर्गीय महिलांसाठी आरक्षण असण्याची मागणी करण्यात आली होती. त्याचा संदर्भ देत या जातीगटाच्या महिलांचे हक्कही जपले जातील असे त्यांनी सांगितले. महिलांवर घरापासून शेतापर्यंत अन्यायच झाला आहे. तरीही त्यांनी सामाजिक व आर्थिक स्तरावर मोठे योगदान दिले आहे. भारताच्या संपूर्ण विकासासाठी महिलांच्या क्षमतांना योग्य उपयोग होणे गरजेचे आहे, असे सांगून हे विधेयक महिलांच्या आकांक्षा व देशाच्या प्राचीन व समृद्ध संस्कृतीचा उत्सव असल्याचे ते म्हणाले. विधेयकावर आजही गोंधळ झाला तरी शेवट मात्र गोड झाला असेही पंतप्रधानांनी आगाज भलेही कुछ भी हुआ हो, लेकिन अंजाम तो अच्छा हुआ असे उर्दू शायरीत सांगितले. सर्वंकष चर्चेसाठी सर्वपक्षीय बैठक बोलवा बहुचर्चित, बहुप्रलंबित आणि वादग्रस्त महिला आरक्षण विधेयकावरून सोमवारी संसदेत गदारोळ करणार्‍या यादव त्रिकुटाने आज पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेऊन त्यांच्याकडे विधेयकाबद्दल नाराजी व्यक्त केली. या विधेयकावर सर्वंकष चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी त्यांनी केली. समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायमसिंह यादव, राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यांनी काल संसदेत गोंधळ घालून महिला आरक्षण विधेयक संमत होऊ दिले नाही. अल्पसंख्याक महिला, दलित महिलांना या आरक्षणाचा लाभ व्हायला हवा, पण तशा तरतुदी विधेयकात नाहीत, असा त्यांचा आक्षेप होता. त्याला संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनीही पाठिंबा दिला आणि हे तीन यादव यांनी आज सकाळी पंतप्रधानांच्या निवासस्थानी तब्बल 45 मिनिटे पंतप्रधांनांशी चर्चा केली आणि विधेयकातील सगळे खटकणारे मुद्दे त्यांच्यापुढे मांडले. आमचा महिला आरक्षण विधेयकाला विरोध नाही. पण त्याचा फायदा गरजू महिलांना व्हायला हवा, ही आमची भूमिका आहे. तीच आम्ही पंतप्रधानांपुढे मांडली, अशी माहिती लालूप्रसाद यादव यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली. मुस्लीम महिला आणि मागासवर्गीय महिलांना या आरक्षणाद्वारे प्रतिनिधीत्व मिळायला हवे. ते किती टक्के द्यायचे हे तुम्ही ठरवा, असे त्यांनी पंतप्रधानांना सांगितले. या विधेयकासंबंधी सर्वपक्षीय बैठक घेऊन, सगळ्यांचीच मते जाणून घेण्याची मागणीही त्यांनी केली. विधेयकाच्या चर्चेबाबत सोनिया समाधानी महिला आरक्षण विधेयकावर राज्यसभेत सुरू असलेल्या चर्चेबाबत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी समाधान व्यक्त केले. हे विधेयक राज्यसभेत मंजूर होण्याची शक्यता व्यक्त करताना मात्र, लोकसभेतील विधेयकाच्या भवितव्याबाबत साशंकता व्यक्त केली. राज्यसभेत विधेयकावर चर्चा सुरू असताना त्या पत्रकारांशी बोलत होत्या. आम्हाला अंधारात ठेवून सरकारने विधेयक संमत करून घेण्याचा घाट घातला आहे, अशी नाराजी रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी बोलून दाखविली होती. त्याबाबत विचारले असता, गांधी म्हणाल्या, की विधेयक संसदेमध्ये संमत करण्याचा निर्णय ज्यावेळी घेण्यात आला, त्या वेळी त्या उपस्थित होत्या. किंबहुना त्याही या निर्णयात सहभागी झाल्या होत्या. जर, या विधेयकाला घटकपक्षांची माान्यता आहे, तर बॅनर्जी यांची नाराजी कितपत ग्राह्य धरावी, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. लालूंना सात मुली.. सोनिया गांधी आणि लालू प्रसाद यादव यांच्यात झालेल्या अनौपचारिक चर्चा झाली. या चर्चेत गांधी यांनी लालू यांना तुम्हाला सात मुली आहे, तर तुमच्या घरातून तुम्हाला किती पाठिंबा आहे, असे विचारले. त्याबाबत आपण दूरध्वनी करून राबडीदेवींना विचारणा करू का, असा प्रश्नही केला. राबडीदेवींना तुम्ही मुख्यमंत्री केले, तेव्हा महिला या समाजाच्या अविभाज्य घटक आहे, त्यांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे, असे गांधी यांनी ऐकविले. त्यावर लालू निरुत्तर झाले. ममता संतप्त महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आलेली पद्धत, तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या आणि रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांना मान्य नाही. या विधेयकाबाबत आपल्या पक्षाला अंधारात ठेवण्यात आले होते, अशी तक्रार त्यांनी केली. राज्यसभेत या विधेयकावर चर्चा सुरू असतानाच, संतप्त रेल्वेमंत्री म्हणाल्या, की या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक घेण्याचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी आश्वासन दिले होते. मात्र हे विधेयक तडकाफडकी मांडण्यात आले आणि चर्चाही सुरू करण्यात आली.


प्रिंट काढा