Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:46:37 hrs

मुख्य पान | बोधेगावच्या घरकुल लाभार्थींचे उपोषण आश्वासनानंतर मागे
बोधेगावच्या घरकुल लाभार्थींचे उपोषण आश्वासनानंतर मागे
शेवगाव, दि. 9 (प्रतिनिधी) (10-March-2010)
Tags : Ahmednagar,Maharashtra
 

- राजीव गांधी घरकुल योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात लाभार्थींची निवड होऊनही काही जाचक अटींमुळे बँकेकडून कर्ज मिळत नसल्याने बोधेगावच्या लाभार्थींनी सुरू केलेले उपोषण आज आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. राजीव गांधी घरकुल योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात पंचायत समितीने 12 लाभार्थींची निवड करून संबंधित प्रकरणे बोधेगाव येथील सेंट्रल बँकेत दोन वर्षांपूर्वी पाठविली. परंतु बँकेच्या जाचक अटींमुळे लाभार्थींना कर्ज मिळत नव्हते. हेलपाटे मारून लाभार्थी वैतागले होते. अनेकदा पाठपुरावा करूनही कोणीच दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ आज ग्रामपंचायत सदस्य गंगाधर घोरतळे, महेमूद शेख, बाबू ढवाण, संतोष मोताळे, शायदा शेख आदींनी बोधेगाव मंडल कार्यालयासमोर उपोषणास प्रारंभ केला. उपोषणकर्त्यांची जि. प. सदस्य नितीन काकडे, पंचायत समितीचे उपसभापती रामनाथ राजपुरे, सरपंच राम अंधारे, उपसरपंच भाऊराव भोंगळे, विस्तार अधिकारी पाखरे, बँकेचे शाखाधिकारी होळकर, कामगार तलाठी खान यांनी दुपारी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. आठ दिवसांच्या आत म्हाडाचे हमीपत्र सादर करण्याचे ठोस आश्वासन विस्तार अधिकारी पाखरे यांनी दिले. त्यानंतर उपोषणार्थींनी आपले उपोषण दुपारी 3 वाजता मागे घेतले.


प्रिंट काढा