- तालु्नयातील कुकडी कालवा लाभक्षेत्राखालील शेतामध्ये उभी असलेली ऊस, फळबागा, कांदा, भाजीपाला या पिकांस घास, मका कडवळ आदी चारा पिके पाण्याअभावी जळू लागली आहे. त्यामुळे जनावरांसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनला असल्याने कुकडीचे उन्हाळ्यातील पहिले आवर्तन त्वरित सोडावे, अशी मागणी कालवा पाटपाणी समितीचे अध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी निवेदनाद्वारे कुकडीचे कार्यकारी अभियंता सर्जेराव पावसे यांच्याकडे केली आहे.
तालु्नयात कुकडी, श्रीगोंदा, साईकृपा हे तीन साखर कारखाने असून चौथा साखर हिरडगाव फाटा येथे पूर्णत्वास येत असल्याने उसाचे क्षेत्र वाढले आहे. याचबरोबर लिंबू, द्राक्षे, संत्रा, डाळिंब या फळबागांबरोबर कांदा, भाजीपाला या पिकांसह दुग्धव्यवसायामुळे जनावरे वाढल्याने घास, मका, कडवळ आदी जनावरांसाठी चारा पिके मोठ्या प्रमाणात आहेत.
कुकडीचे उन्हाळ्यातील पहिले आवर्तन मार्च महिना सुरू झाला तरी अद्यापपर्यंत न सुटल्याने पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. चालू वर्षी कुकडी लाभक्षेत्रातील धरणांमध्ये मागील वर्षीपेक्षा मुबलक पाणीसाठा असून खरीप-रब्बी हंगामासाठी एकच आवर्तन सोडल्याने धरणांमध्ये पाणीही शिल्लक आहे. मार्च महिना सुरू झाल्याने उन्हाची तीव्रता वाढून विहिरी, बोअर यांचेही पाणी संपुष्टात आल्याने शेतातील उभी पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत. पिकांबरोबर जनावरांच्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे.
शेतातील कोट्यवधी रुपयांची उभी पिके जळून खाक होतील याचा गांभीर्याने विचार करून कुकडीचे उन्हाळी पहिले आवर्तन त्वरित सोडून तालु्नयातील शेतकर्यांना दिलासा द्यावा, असे म्हस्के यांनी निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. अन्बलगन यांना पाठविल्या आहेत. |