Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:19:09 hrs

मुख्य पान | रोजगार निर्मितीसाठी कालबद्ध कार्यक्रमांची अंमलबजावणी ः ना. विखे
रोजगार निर्मितीसाठी कालबद्ध कार्यक्रमांची अंमलबजावणी ः ना. विखे
प्रवरानगर, दि. 9 (वार्ताहर) (10-March-2010)
Tags : Ahmednagar,Maharashtra
 

- राज्यातील आणि केंद्रातील लोकशाही आघाडी शासनाकडून सर्वसामान्यांच्या असलेल्या अपेक्षा पूर्ण करतानाच रोजगार निर्मितीसाठी कालबद्ध कार्यक्रमाची अंमलबजावणी करणार असल्याची माहिती परिवहनमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच जनतेच्या अडचणी ऐकण्यासाठी ना. विखे यांनी मतदारसंघात केलेल्या आभार संपर्क दौर्‍यानिमित्त तालु्नयातील पिंप्रीनिर्मळ, बाभळेश्वर, राजुरी, ममदापूर आदी गावातील कार्यकर्ते आणि जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सभापती सुभाष गाडेकर, तहसीलदार राहुल मुंडके, गटविकास अधिकारी अनिल यादव, शांतीलाल आहेर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के, तालुका कृषी अधिकारी अरुण बनकर, पंचायत समिती बांधकाम विभागाचे अधिकारी यु. सी. पवार यांच्यासह विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ना. विखे म्हणाले की, विकासकामे ही सतत चालणारी प्रक्रिया असून, रोजगार आणि पाणी हे दोन प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असल्याने बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यासाठी भविष्यकाळात प्रयत्न करावे लागणार आहेत. व्यवसायासाठी प्रसंगी बिगर व्याजी कर्ज तसेच नोकरीची मागणी असणार्‍यांसाठीही संधी असलेल्या शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील. पिण्याच्या पाण्याबरोबर दुष्काळी भागातील शेतीला पाणी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. या भागाला वरदान ठरलेल्या निळवंडेच्या प्रश्नावर केवळ भाषणबाजी करणार्‍या पुढार्‍यांना निळवंडे नेमके काय आहे, याची माहिती आहे का? असा उपरोधिक सवाल करून विखे म्हणाले, निळवंडे धरणासाठी सर्वात जास्त प्रयत्न आपणच केले. परंतु ते कोणाला सांगितले नाही. वरच्या भागात कॅनॉल झाल्याशिवाय खाली पाणी येणार नाही, हे माहिती नसणार्‍यांनी वरच्या भागातील परिस्थिती पाहून यावी. 2012 पर्यंत हे पाणी आणण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीचा उल्लेख करून ते म्हणाले, कोणी कोणतीही भूमिका मांडली तरी शेवटी कर्तव्य श्रेष्ठ समजून गैरसमज असणारांचे मतपरिवर्तन कामातूनच करून देणार आहोत. बाभळेश्वर येथील प्रलंबित पाणी योजनेबाबत उपस्थित महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेच्या अधिकार्‍यांना ही योजना 31 मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे, तर पिंप्रीनिर्मळ येथील योजना पूर्ण होईपर्यंत टँकर सुरू करण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले. याप्रसंगी जगन्नाथ पाटील, ज्ञानदेव घोरपडे, चंद्रकांत बेंद्रे, राजेंद्र म्हस्के, ज्ञानदेव म्हस्के, समीर शेख, प्रकाश गोरे, मारुती गोरे, नानासाहेब गोरे, सतीश ससाणे, शरद लोंढे, संजय ससाणे यांच्यासह विविध विकास संस्थांचे व ग्रामपंचायतीचे अधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रिंट काढा