Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:49:49 hrs

मुख्य पान | लोकन्यायालयात 39 प्रकरणे निकाली
लोकन्यायालयात 39 प्रकरणे निकाली
नेवासा, दि. 9 (प्रतिनिधी) (10-March-2010)
Tags : Ahmednagar,Maharashtra
 

- आपापसात तडजोड केल्याने सामाजिक स्वास्थ्य लाभते, याची जाणीव जनतेला होत असल्याने लोकन्यायालयांना वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे प्रतिपादन नेवासा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अनिलकुमार शर्मा यांनी केले. नेवासा न्यायालयाच्या आवारात आयोजित लोकन्यायालयात ते बोलत होते. चलनक्षम दस्तऐवजांचा कायदा कलम 138 प्रमाणे दाखल असलेल्या फिर्यादीकरिता नेवासा वकील संघ व विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने लोकन्यायालय भरविण्यात आले होते. 70 प्रकरणे तडजोडीकरिता ठेवण्यात आली होती. त्यापैकी 39 प्रकरणांमध्ये तडजोड झाली. या प्रसंगी न्या. राजेंद्र घोगले, पंचायत समितीचे कृषी अधिकारी पंडितराव वाघिरे, नेवासा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. बी. एस. टेमक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्वागत व प्रास्तविक अॅड. के. एच. वाखुरे यांनी केले. पंच म्हणून माधवी कुलकर्णी, अॅड. सी. टी. कदम यांनी काम पाहिले. या प्रसंगी अॅड. पी. आर. माकोणे, अॅड. आर. बी. खिळदकर, अॅड. एम. बी. कुलकर्णी, अॅड. पी. एस. वाखुरे उपस्थित होते. अॅड. बी. एस. टेमक यांनी उपस्थितांचे आभार मानले.


प्रिंट काढा