|
|
|
|
| मुख्य पान | पत्नी, मुलाच्या हत्येप्रकरणी पतीस जन्मठेप |
| पत्नी, मुलाच्या हत्येप्रकरणी पतीस जन्मठेप |
|
| कोपरगाव, दि. 9 (प्रतिनिधी)(10-March-2010) |
Tags : Ahmednagar,Crime,Regional,Maharashtra |
- अंगावर रॉकेल ओतून पत्नी व मुलाचा खून करणार्या अमोल टापसे यास कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. गर्डे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
याबाबत माहिती अशी, कोल्हार येथील आरोपी अमोल सुभाष टापसे हा त्याची पत्नी योगिता हिच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिला नेहमी मारहाण करून छळ करीत असे. योगिताच्या माहेरच्या लोकांनी आरोपीची वेळोवेळी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्यात काहीही बदल झाला नाही. दि. 29 मे 2006 रोजी अमोलने सकाळी 7 ते 7.30 च्या सुमारास योगिताशी भांडण करून योगिता व मुलगा मयूर यांच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना जाळले. त्यानंतर दुसर्या दिवशी मयूरचा, तर पाच दिवसांनी योगिताचादेखील मृत्यू झाला. या प्रकरणी लोणी पोलिसांनी कोपरगाव न्यायालयात भा.दं.वि. कलम 302, 498 (अ) व इतर कलमाखाली दोषारोपपत्र दाखल केले.
सदरच्या खटल्यामध्ये सरकारच्यावतीने अॅड. विद्यासागर शिंदे यांनी काम पाहिले. त्यांनी एकूण 6 साक्षीदार तपासले. आरोपीच्यावतीने सदरची घटना ही स्टोव्हच्या भड्नयाने झाल्याचा बचाव करण्यात आला. मयत योगिता ही प्रवरा हॉस्पिटल, लोणी येथे उपचार घेत असताना तिचा मृत्युपूर्व जबाब घेण्यात आला होता. तो ग्राह्य धरून न्यायालयाने अमोल टापसे यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. |
प्रिंट काढा |
|
|
|