- राहुरी, नगर, पाथर्डी तालु्नयाअंतर्गत असणार्या पाणीयोजना यशस्वीपणे चालविण्यासाठी ग्रामपंचायतीला पाणीपट्टी भरून सहकार्य केल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लोकसहभागातून सोडविण्यास मदत होईल. त्यासाठी दोन रुपये रोज या प्रमाणे प्रति कुटुंब पैसे भरतील, अशा योजना ग्रामपंचायत स्तरावर राबवून महिनाकाठी 60 रुपये पाणीपट्टीचा वसूल केल्यास पिण्याच्या पाण्याचा आणि योजना चालविण्याचा प्रश्न मार्गी लागेल, असे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले.
राहुरी तालु्नयासह नगर, पाथर्डी तालु्नयातील बुर्हाणनगर आणि 44 गावांची प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत करण्यात येणार असल्याने कर्डिले यांनी सांगितले. ग्रामस्थ, जीवन प्राधिकरण अधिकारी तसेच जिल्हा परिषद अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत पाणी योजनेच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. वरवंडी ग्रामस्थांची बैठक घेऊन आ. कर्डिले यांनी बुर्हाणनगर आणि 44 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली आहे. कोणत्या लाभधारक ग्रामपंचायतीची तक्रार असेल, पाणी मिळत नसेल, योजनेत त्रुटी असतील तर काम पूर्ण करून घ्या. आता पाणी योजना चालविण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवरून चार ठिकाणी ग्रामसमित्या स्थापन करून पाणीपट्टी वसुली आणि देखभाल दुरूस्ती आवश्यक आहे, असे सांगितले.
पाणीपट्टी वसूल व्हावी, असे वाटत असेल तर ग्रामपंचायतीने दररोज दोन रुपये प्रति कुटुंबाप्रमाणे पाणीपट्टी वसूल करावी. महिन्याकाठी 60 रुपये पाणीपट्टी भरणे गरिबातील गरीब कुटुंबांना श्नय आहे. पाणीपुरवठा योजना गावांसाठी आहेत. त्यामध्ये प्रत्येक कुटुंबाने नळकने्नशन घेणे गरजेचे आहे. त्यामुळे सार्वत्रिक पाणीपट्टी विभागून दरडोई कमी प्रमाणात येते. पाणीपट्टी वसुली 100 टक्के असल्यास शासनस्तरावरून विविध अनुदान सवलती मिळण्यासाठी मदत होते. आपल्या ऐपतीप्रमाणे दोन रुपये रोज पाणीपट्टी ग्रामपंचायतीला भरा. पाण्याचा प्रश्न सोडवल्यास कुटुंब, गाव समृद्ध होईल, असे मार्गदर्शन आ. कर्डिले यांनी केले. जीवन प्राधिकरण विभागाचे अधीक्षक अभियंता सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता अविनाश पांडकर, शाखा अभियंता सुरेश जकली, शरद दहिफळे, राधेश्याम शर्मा, दीपक पाटील, जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता निकम, उपअभियंता मृणाल धगधगे यांनी योजनांची माहिती दिली. यावेळी जि.प.सदस्य विक्रम तांबे, सुभाष गायकवाड, अंशाबापू ढगे, प्रदीप पवार, गटविकास अधिकारी ज्ञानदेव निमसे, रामकृष्ण कर्डिले आदी उपस्थित होते. |