- आयपीएल स्पर्धा घेणे हे युवा खेळाडूंसाठी योग्यच आहे तसेच अशा स्पर्धेतून त्यांना प्रतिस्पर्धी संघाचा दबाव झेलण्याचा सराव होतो, आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. त्यांच्या खेळाला एक वेगळे वळण लागते. राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याआधी या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंना सामोरे जाण्याची संधी मिळते. युवासाठी ही अत्यंत चांगली स्पर्धा आहे, असे मत टीम इंडियाचा कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जसचा आघाडीचा खेळाडू महेंद्रसिंग धोनी याने व्यक्त केले. आयपीएलमुळे खुवा खेळाडूंचा खेळ सुधारतो.
खेळाडूंना खेळातले बारकावे शिकण्याची संधी मिळते. याचे उदाहरण देताना धोनी पुढे म्हणतो, की पहिल्या आयपीएल पर्वात खेळलेले खेळाडू आत टीम इंडियात आपल्या खेळीने धुमाकूळ घालत आहेत. आयपीएल स्पर्धेतून सुरेश रैना, मनप्रीत गोनी, मुरली विजय, एस. बद्रिनाथसारखे खेळाडू आज भारतीय संघात आहेत. खेळाडूंना घडविण्याचे काम आयपीएल करते, असेही धोनीने आयपीएल स्पर्धेच्या कौतुकात म्हटले. |