- आयपीएलच्या समालोचन कक्षात आता मंदिरा बेदी दिसणार आहे. सेट मॅक्सने तिच्याशी असलेला करार संपविला असून दुसर्या अँकरचा शोध सुरू केला आहे. यामुळे येत्या 12 मार्चपासून सुरू होणार्या आयपीएलमध्ये मंदिरा बेदी दिसणार नाही. सेट मॅक्सच्या सूत्रांनी सांगितले की, चॅनलमध्ये काही नवीन कल्पना करण्याचा विचार सुरू आहे. परंतु, त्यासाठी मंदीराची जादू आता फिकी पडली आहे. यामुळे युवा चेहर्यांचा शोध घेऊन नवीन काही सुरू केले जाणार आहे. मंदिराच्या जागी समीर कोचर, गौरव कपूर, आयुशमान खुराणा आणि अंगद बेदी या युवा चेहर्यांना अँकरची संधी मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी मंदिराने आई होण्याची इच्छा व्यक्त केली होती; त्यामुळे तिचा करार संपविला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. |