Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:42:28 hrs

मुख्य पान | सचिन, सौरव आमने-सामने
सचिन, सौरव आमने-सामने
नवी दिल्ली, दि. 9 (वृत्तसंस्था) (10-March-2010)
Tags : Ahmednagar,International,Sports
 

- आयपीएलच्या दुसर्‍या सत्रात निराशाजनक कामगिरी करणार्‍या कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्सच्या संघाने येत्या 12 मार्चपासून सुरू होणार्‍या तिसर्‍या सत्रासाठी जोरदार सराव सुरू केला आहे. आयपीएलमधील इतर संघांच्या तुलनेत या संघाचा सराव जोरात सुरू आहे. मुकेश अंबानीने मुंबई इंडियन्सचा संघ सर्वात जास्त किंमत देऊन विकत घेतला होता. परंतु, पहिल्या सत्रात पाचव्या तर दुसर्‍या सत्रात सातव्या स्थानावर मुंबईचा संघ राहिला. यामुळे या वर्षी चांगली कामगिरी करण्याच्या निर्णयाने मुंबईच्या संघाने जोरदार सराव सुरू केला आहे. केकेआरचा संघही 2008 मध्ये सहाव्या तर मागील वर्षी शेवटच्या स्थानावर राहिला होता. केकेआरचा संघ मागील 14 सामन्यांतून केवळ तीन सामन्यांत विजयी झालेला आहे. यामुळे चांगल्या कामगिरीचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. केकेआरचा कर्णधार सौरव गांगुली आणि प्रशिक्षक डेव्ह वॉटमोर यांच्या नेतृत्वाखाली जोरात तयारी सुरू आहे. 2009 चा आयपीएलचा थरार दक्षिण आफ्रिकेत रंगला होता. यामुळे अंबांनींच्या संघाने यावर्षी फेब्रुवारीपासूनच सरावास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे कोलकाता नाईट रायर्डर्स संघाचा मालक सिनेअभिनेता शाहरुख खानने आपल्या संघाच्या प्रचारासाठी कुठलीही कसर सोडली नव्हती, मात्र खेळाडूंनी त्याला खूप निराश केले. त्यामुळे गेल्या वर्षी शाहरूख अर्ध्यांतूनच आयपीएल स्पर्धा सोडून आफ्रिकेतून मायदेशी परतला होता. केकेआर गेल्यावेळी 14 सामन्यापैकी अवघ्या तीन सामन्यात विजय संपादन करून मालिकेत शेवटच्या स्थानावर होता. तर 2008 मध्ये सहाव्या स्थान मिळविले होते.


प्रिंट काढा