Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:35:59 hrs

मुख्य पान | राम ताकवलेंना आज गोदावरी गौरव
राम ताकवलेंना आज गोदावरी गौरव
Nasik(10-March-2010)
Tags : Nashik,News,Regional
 

नाशिक, दि. 9 (सांस्कृतिक प्रतिनिधी)- कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणा-या गोदावरी गौरव पुरस्कारांचा प्रदानसोहळा उद्या (दि.10) महाकवी कालिदास कलामंदिरात सायंकाळी 6 वा. होणार आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते संपन्न होणा-या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणा-या प्रसिद्ध शाहीर साबळे (नाट्य),इंदिरा गांधी राष्ट्ीय मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले (ज्ञान), 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यावेळी लाखो नागरिकांचा प्राण वाचविणारे रेल्वेचे उद्घोषक विष्णू झेंंडे (साहस), ख्यातनाम सतारवादक उस्ताद अब्दुल हलीम जाफरखान (संगीत), ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते (चित्र), भोपाळ गॅसपीडित महिला उद्योग संघटनेच्या माध्यमातून भोपाळ वायुगळतीमुळे निराधार झालेल्यांच्या न्याय्य हक्कांसाठी झटणारे अब्दुल जब्बार खान (लोकसेवा) यांना अकरा हजार रूपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र स्वरूपात देण्यात येणार आहे.


प्रिंट काढा