|
| मुंबई, कोलकात्यात हाय अॅलर्ट |
|
| नवी दिल्ली, दि.8 (वृत्तसंस्था) (09-March-2010) |
Tags : Ahmednagar,Crime,Regional,International,Maharashtra |
- दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने मुंबई, कोलकाता आणि बंगळुरू या तीन शहरांमध्ये हाय अलर्टचा इशारा दिला आहे.
इंडियन मुजाहिदीनच्या सलमान अहमद या दहशतवाद्याच्या चौकशी नंतर गृहखात्याने हाय अॅलर्ट दिला आहे. भारतातील प्रमुख शहरे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आहेत. मुंबई, बंगळुरू आणि कोलकाता या तीन शहरांमध्ये अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय उद्योग आहेत. त्यामुळे या शहरांमध्ये घातपात करुन जगाचे लक्ष वेधून घ्यायचे आणि भारताची आर्थिक कोंडी करण्याचा दहशतवाद्यांचा डाव आहे, अशी माहिती सलमानच्या चौकशीतून उघड झाली आहे. |
प्रिंट काढा |
|
|
|