Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:42:23 hrs

मुख्य पान | गल्फच्या आर्थिक विकास क्षेत्रामुळे 10 लाख नोकर्‍या
गल्फच्या आर्थिक विकास क्षेत्रामुळे 10 लाख नोकर्‍या
मुंबई, दि.8 (प्रतिनिधी)- (09-March-2010)
Tags : Ahmednagar,International
 

नवी मुंबईतल्या प्रस्तावित गल्फ फायनान्स हाऊसच्या (जीएफएच) आर्थिक विकास क्षेत्रामुळे दहा लाखांवर लोकांना घरे मिळणार असून, मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल, असे मत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी व्यक्त केले. मुंबईतील परळ येथील हॉटेल आयटीसी येथे जीएफएच आर्थिक विकास क्षेत्राचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. जीएफएचचे अध्यक्ष एसाम जाना, राज्याचे मुख्य सचिव जे.पी.डांगे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव ए.एम.खान या वेळी उपस्थित होते. नवी मुंबईतल्या पनवेलजवळ सुमारे एक हजार 760 एकर परिसरात जीएफएच या कंपनीद्वारे उद्योग-धंदे सुरू करण्यात येणार आहेत. यात 725 एकरांत एनर्जी सिटी (ऊर्जा), 500 एकर जागेत आयटी, टेलिकॉम सिटी आणि 575 एकरांत एंटरटेन्मेंट सिटी उभारण्यात येणार आहे. हे प्रकल्प सुरू झाल्यानंतर सुमारे 2 लाख 50 हजार लोकांना थेट तर सुमारे 7 लाख 50 हजार लोकांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. इको डेव्हलपमेंट झोन या नावाने हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. प्रत्यक्षात हे प्रकल्प सुरू झाल्यानंतर सुमारे 10 लाख 40 हजार इको फ्रेंडली घरांची निर्मिती याच परिसरात होणार आहे. आर्थिक विकासाबरोबरच औद्योगिक विकासालाही चालना मिळणार आहे. मुंबईतील लोकांपुढे राहण्यासाठी घरांचा मोठा प्रश्न असून, अशा विविध प्रकल्पांमुळे प्रश्न सुटण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. रोजगाराबरोबरच जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधाही उपलब्ध होणार आहेत. या शहरात हा प्रकल्प उभारला जात असल्याने मुंबईच्या वैभवात आणखी भर पडणार आहे. महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी अनेक उद्योजक उत्सुक असून त्यांचे आम्ही स्वागत करतो, असे मुख्यमंत्री या वेळी म्हणाले. जीएफएचचे अध्यक्ष एसाम जाना म्हणाले की, ‘मी आजवर कायम संकेत दिले आहेत की भारत आणि त्यातही महाराष्ट्र हे राज्य गुंतवणुकीसाठी मला आदर्श ठिकाण वाटते. पायाभूत सोयीसुविधा आणि ऊर्जा, सॉफ्टवेअर, दूरसंचार यांसारख्या पूरक क्षेत्रात भारतात उपलब्ध संधी या अमर्याद आहेत. त्यातच देशांतर्गत महत्त्वाच्या व्यवसाय व उद्योगक्षेत्रात महाराष्ट्राला असलेल्या अद्वितीय स्थानासह या राज्याने अवलंबिलेल्या गुंतवणूक स्नेही आणि उद्योगप्रवण धोरणामुळे महाराष्ट्र हे थेट विदेशी गुंतवणुकीत देशातील सर्वात अग्रेसर राज्य राहिले आहे आणि या पुढेही राहील’.


प्रिंट काढा