|
|
|
|
| मुख्य पान | अल कायदाच्या दोन दहशतवाद्यांना अटक |
| अल कायदाच्या दोन दहशतवाद्यांना अटक |
|
| इस्लामाबाद, दि.8 (वृत्तसंस्था) (09-March-2010) |
Tags : Ahmednagar,International |
- पाकिस्तानी गुप्तचर खात्याच्या अधिकार्यांनी दोन अल कायदाच्या दहशतवाद्यांना रविवारी (ता.7) कराचीमध्ये अटक केली. त्यापैकी एक अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचा प्रवक्ता म्हणून अनेक वर्षे काम करणार्या एका अमेरिकी नागरिकाचाही समावेश आहे.
अटक केलेल्या व्यक्तीचे नाव अबू याह्या आझम ऊर्फ ऍडम गॅडहन असून, तो अमेरिकेचा नागरिक आहे. सीआयएला हव्या असलेल्या दहा जणांच्या यादीमध्ये त्याच्या नावाचा सहभाग आहे. अमेरिकेच्या विरोधात अफगाणिस्तानमधून लढणार्या दहशतवाद्यांचा तो म्होरक्या आहे. 11 सप्टेंबर 2001 मध्ये अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये त्याचा सहभाग होता. दुसर्या दहशतवाद्याला दोन दिवसांपूर्वी सुपर हायवेजवळील सोहराब गॉथ नावाच्या परिसरातील त्याच्या घरातून अटक करण्यात आली. अल कायदा आणि तालिबानचे दहशतवादी कराची शहराचा सुरक्षित अड्डा म्हणून वापर करत आहेत, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. या दोघांनाही अज्ञात स्थळी हलविण्यात आले आहे. |
प्रिंट काढा |
|
|
|