Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:42:38 hrs

मुख्य पान | नायजेरियात 500 ठार
नायजेरियात 500 ठार
अबुजा, दि.8 (वृत्तसंस्था)-(09-March-2010)
Tags : Ahmednagar,International
 

नायजेरियातील उत्तरेकडील जोस शहरात झालेल्या वांशिक हल्ल्यात 500हून अधिक जण ठार झाले आहेत. ख्रिस्ती आणि मुस्लिम लोकांमधील वांशिक वादामुळे हा हल्ला झाल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. यापूर्वी जानेवारीमध्ये झालेल्या वांशिक हल्ल्यात 200 जण ठार झाले होते. रविवारी रात्री 1.30 सुमारास हल्लेखोरांनी हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले. हल्लेखोरांनी घरांना आणि गाड्यांना आग लावल्याचे राज्याचे मुख्य माहिती अधिकारी ग्रेग एन्लॉग यांनी सांगितले. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, नायजेरियाचे हंगामी अध्यक्ष गुडलक जोनाथन यांनी जोस शहरात लष्कर पाठवण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिक प्रसारमाध्यमांनी या प्रकरणी काही लोकांना अटक केल्याचे वृत्त दिले आहे.


प्रिंट काढा