- डेव्हिस चषकात पराभवाला सामोरे गेलेल्या सोमदेव देवबर्मनच्या जागतिक एटीपी मानांकनात सात क्रमांकाने भर पडली आहे. सोमदेवने 128 व्या स्थानावरून 121 व्या स्थानावर आगेकूच केली आहे, तर भारतीय महिला टेनिस स्टार सानिया मिर्झाच्या मानांकनात एका अंकाने घसरण झाली आहे; ती आता 84 व्या स्थानावर आहे. भारताची उदयोन्मुख खेळाडू पूजाश्री व्यंकटेश 347 व्या स्थानावर कायम आहे. दुहेरीत महेश भूपती सहाव्या, तर पेस आठव्या स्थानावर विराजमान आहे. एटीपी आणि डब्ल्यूटीएच्या पहिल्या तीन क्रमांकावर कुठल्याही प्रकारचा उतारचढ झालेला नाही. पुरुष वर्गात रॉजर फेडरर प्रथम, नोवाक जाकोविच दुसर्या, तर राफेल नडाल तिसर्या स्थानावर कायम आहेत. महिला वर्गात सेरेना विलियम्स प्रथम, दिनारा सफिना द्वितीय, तर स्वेतलाना कुज्नेत्सोवा तिसर्या स्थानावर आहे. |