Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:42:48 hrs

मुख्य पान | सातव्या स्थानासाठी आव्हान कायम
सातव्या स्थानासाठी आव्हान कायम
नवी दिल्ली, दि. 8 (वृत्तसंस्था) (09-March-2010)
Tags : Ahmednagar,International,Sports
 

- पहिल्या सामन्यापासून चर्चेत राहिलेला शिवेंद्रसिंगने नोंदविलेल्या अंतिम गोलमुळे भारतीय संघाने 12 व्या विश्वचषकातील आफ्रिका विरुद्धचा पहिल्या फेरीतला शेवटचा सामना बरोबरीत सोडला. यजमान भारतीय हॉकी संघाला शेवटच्या लिग सामन्यात आपल्यापेक्षा कमजोर संघाला बरोबरीत रोखण्यासाठी खूपच घाम गाळावा लागला. या बरोबरीने भारतीय संघाला ब गटात चौथे स्थान मिळाले आहे. आता भारतीय संघाला गट अ च्या चौथा क्रमांकावर असनार्‍या संघाशी मालिकेतील सातव्या क्रमांकासाठी लढत करावी लागणार आहे. सामन्याचे शेवटचे पाच मिनिट बाकी असताना तुषार दिलेला पास अतिशय चाणाक्षपणे शिवेंद्रसिंगने गोलमध्ये रूपांतर करून सामना बरोबरीत राखला अन्यथा ह्या सामन्यातही भारतीय संघाचा 3-2 ने पराभव निश्चितच होता. दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार अॅसिटन स्मिथला सामनावीर पुरस्कार देण्यात आला, तर भारतीय खेळाडू गुरूजीतसिंग याला उत्कृष्ट खेळाबद्दल गौरविण्यात आले. मध्यांतरापर्यंत भारतीय संघ 2-1 ने आघाडीवर होता. संपूर्ण सामन्यात भारताचा प्निकर संदीपसिंगने अफलातून खेळाचे प्रदर्शन करून हॉकी प्रेमींचे डोळ्याचे पारने फेडले.भारतीय संघाचा पुढचा सामना 12 मार्चला होणार आहे. दुसर्‍या अन्य सामन्यात स्पेनने इंग्लंडच्या विजयी अभियानाला खिंडार पाडले. स्पेनने इंग्लंडला 2-0 ने पराभूत केले. या विजयाने स्पेनने ब गटात तिसरे स्थान पटकाविले आहे. तर इंग्लंड याआधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे. स्पेन अन् ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ 9 अंकावर स्थिर आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान संघाला 2-1 ने पराभूत करून उपांत्य फेरी गाठली आहे. ऑस्ट्रेलियाकडून एबोर्टने 38 व्या आणि 68 व्या मिनिटाला गोल केले.


प्रिंट काढा