Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:50:36 hrs

मुख्य पान | टीम इंडियाला मिळणार 75 हजार डॉलर
टीम इंडियाला मिळणार 75 हजार डॉलर
दुबई, दि. 8 (वृत्तसंस्था) (09-March-2010)
Tags : Ahmednagar,International,Sports
 

- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकदिवसीय मानांकनात सन 2009-10 मध्ये भारतीय क्रिकेट संघ दुसर्‍या स्थानावर निश्चित राहणार आहे. यामुळे आयसीसीकडून भारताला 75 हजार डॉलर मिळणार असून ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या क्रमांकावर राहणार असल्याने त्यांना एक लाख 75 हजार डॉलर मिळणार आहे. संघनायक महेद्रसिंग धोनी 819 अंकांसह अव्वल स्थानावर कायम आहे. न्यूझीलंडचा संघ दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यामुळे भारताचे दुसरे स्थान निश्चित झाले. आता न्यूझीलंडने उर्वरित तीन सामने जिंकले तरी भारताच्या 122 रेटिंग गुणापर्यंत ते पोहोचू शकणार नाही. एकदिवसीय फलंदाजांच्या यादीत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी पहिल्या स्थानावर कायम आहे. सलामीवीर वीरेंद्र सेहवाग 694 अंकांसह 11 व्या स्थानावर आहे. सुरेश रैनाने 15 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 762 गुणांसह चौथ्या, तर वीरेंद्र सेहवाग अकराव्या स्थानावर आहे. युवराज सिंग 13 व्या क्रमांकावर आहे.


प्रिंट काढा