Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:48:58 hrs

मुख्य पान | ‘आरोग्य’ सेवकाच्या आत्महत्येमुळे ‘विभाग’ पुन्हा वादाच्या भोवर्‍यात
‘आरोग्य’ सेवकाच्या आत्महत्येमुळे ‘विभाग’ पुन्हा वादाच्या भोवर्‍यात
Nasik(09-March-2010)
Tags : Nashik,News,Regional
 

नाशिक/अंबासन दि. 8 (जि.प. प्रतिनिधी/ वार्ताहर)- जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील गोंधळ काही केल्या कमी होण्याची चिन्हे नसून वैद्यकीय अधिकार्‍यांची बिले रखडविणे, वैद्यकीय अधिकार्‍यांच्या रजा मंजूर न करणे, कर्मचार्‍यांच्या सेवाज्येष्ठता याद्या धूळ खात पडणे, वेळेवर वेतन न होणे अशा एक ना अनेक कारणांनी वादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराचा आता एक आरोग्य सेवकच बळी ठरल्याचे धक्कादायक वृत्त आहे. अंबासन प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक हिंमत सूर्यवंशी असे त्या कर्मचार्‍याचे नाव असून त्याने काल राहत्या घरी विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. याबाबत नामपूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हिंमत सूर्यवंशी गेल्या सात वर्षापासून अंबासन प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत होता. वेळेवर न होणारे वेतन आणि गेल्या दोन ते तीन वर्षापासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या सूर्यवंशी यांचे नाव पदोन्नतीच्या यादीत नसल्याची कुणकुण लागताच निराश झालेल्या सूर्यवंशी यांनी काल (दि.8) सकाळी विषप्राशन करून आपली जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. उपचार सुरू असतांनाच सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. कजवाडे (मालेगाव) येथील त्यांच्या मूळ गावी सांयकाळी शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हा परिषदेत आरोग्य विभागातील अनागोंदी कारभाराचा अनेक कर्मचारी आणि अधिकार्‍यांनाही फटका बसल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. एका महिला वैद्यकिय अधिकार्‍याची तर केवळ टक्केवारीतून गरोदरपणाची रजा तीन महिन्यांपासून मंजूर होत नसल्याचेही उघडकीस आले होते. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांच्या सेवाज्येष्ठता याद्या व सेवापुस्तका संबंधित महत्वाच्या नस्त्या जिल्हा परिचारिका प्रशिक्षण केंद्रांत धूळखात पडून असल्याचे कालच वृत्त दै. देशदूतने दिले आहे. आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांना दबावाखाली काम करावे लागत असल्याची तक्रार दबक्या आवाजात कर्मचार्‍यांकडून करण्यात येत आहे. सूर्यवंशी यांच्या आत्महत्येेच्या प्रकारामुळे तर आरोग्य विभागातील अनागोंदी कारभाराचा कळस गाठल्या गेल्याची चर्चा कर्मचार्‍यांमध्ये आहे.


प्रिंट काढा