Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 आयसीसीची स्पॉटफिक्सर खेळाडूंवर तात्पुरती बंदी   वाळूतस्करांना दणका; 5 कोटींचा दंड!   पोलिसांचे धरपकडसत्र; 9 आरोपी जेरबंद   जवळकेत शेतकरी आत्महत्या   मास्टरब्लास्टर झाला हवाई दलाचा ग्रुप कॅप्टन   पिंपरीत एकतर्फी प्रेमातून तरुणीचा खून   सोनिया कॉंग्रेसच्या ‘विक्रमी’ अध्यक्षा   अपहृत पोलिसांच्या शोधासाठी मोहीम तीव्र   Updated on September 4, 2010, 19:52:15 hrs

मुख्य पान | खांड प्रकल्पास निधी कमी पडू देणार नाही ः ना. पवार
खांड प्रकल्पास निधी कमी पडू देणार नाही ः ना. पवार
अकोले, दि. 8 (प्रतिनिधी) (09-February-2010)
Tags : Ahmednagar,Agricultural,Regional,Political,Maharashtra
 

- नियोजित पिंपळगाव खांड लघु पाटबंधारे प्रकल्पास निधी कमी पडू देणार नाही, तसेच तालु्नयातील ऊर्जा व जलसंपदा विभागाकडील एकही प्रश्न पुढील निवडणुकीपर्यंत शिल्लक ठेवणार नाही, असे आश्वासन जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी दिले. जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष सीताराम गायकर यांच्या षष्ठ्यब्दीनिमित्त आयोजित गौरव सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मानपत्र, स्मृतिचिन्ह, बोलेरो गाडी देऊन गायकर यांचा सपत्नीक गौरव ना. अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. सह्याद्रीच्या कुशीत या गौरव ग्रंथाचे प्रकाशन आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार मधुकरराव पिचड होते. ना. पवार पुढे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेचा विकास केला. तीस वर्षांपर्यंत एकाच मतप्रवाहाच्या बाजूने व एकाच व्यक्तीच्या ताब्यात त्या संस्था देऊन जिल्ह्यात गावाची चांगली ओळख करून दिली. गेल्या 60 वर्षांत गावात निवडणूक झाली नाही. अशा गावाचा ‘मोग्रस पॅटर्न’ पुढे यावा अशी आशा व्यक्त करत नगरच्या राजकीय पर्यटनाविषयी उपरोधिक टोला लगावला. दारिद्रयरेषेखालील कुटुंबांना 15 रुपयांत वीज घरगुती वापरासाठी मिळणार असल्याचे स्पष्ट करीत दारिद्रय रेषेखालील कुटुंबांचा फेरसर्वे होणार असून, खर्‍या लाभार्थींना न्याय मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांविषयी तक्रारी असल्याने काम चांगले करायचे नसेल तर कामावरून घरी जावे लागेल, असा इशारा त्यांनी अधिकार्‍यांना दिला. खराब काम करणार्‍या ठेकेदारांनाही त्यांनी तंबी दिली. शेतकर्‍यांच्या हिताचे जिल्ह्यातील सर्व तालु्नयांचे प्रश्न मार्गी लावू. त्यात राहुरी तालुका सोडून, असे म्हणत आमदार कर्डिले यांच्याकडे सूचकतेने बघत ‘सुरेश धस, प्रकाश सोळंके’ सारखे केल्यास विचार करू, असे स्पष्ट केले. खांड प्रकल्पातून दीड मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्प सुरू करणार असल्याचे स्पष्ट करत विकासासाठी शेतकर्‍यांनी मुख्य प्रवाहाची कामे सोडू नयेत, असे आवाहन केले. तालु्नयाचे सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन देत पुढच्या वेळेस आमदार पिचड यांच्याकडे बघत तरुणांना संधी मिळणार आहे, असे जाहीर करताच तरुणांनी टाळ्या वाजविल्या. प्रास्ताविक व स्वागत स्वागताध्यक्ष सुरेशराव कोते यांनी केले. प्रदेशाध्यक्ष आमदार मधुकर पिचड, आ. डॉ. सुधीर तांबे, महामंडलेश्वर रामकृष्णदास, लहवितकर, योगी केशवबाबा चौधरी, आ. शिवाजी कर्डिले, महानंदाचे अध्यक्ष विनायक पाटील, अॅड. प्रेमानंद रुपवते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष पांडुरंग अभंग यांची यावेळी भाषणे झाली. व्यासपीठावर आमदार चंद्रशेखर घुले, संपतराव म्हस्के, रावसाहेब म्हस्के, बिपीन कोल्हे, राजेंद्र जाधव, सीताराम देशमुख, अॅड. शारदा लगड, सौ. हेमलता पिचड, गायकर यांच्या मातोश्री दगडाबाई, पत्नी भीमाबाई, मुलगी संजीवनी, वैभव पिचड, कैलासराव वाकचौरे, मीनानाथ पांडे, प्रकाश नवले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दूरदर्शनच्या निवेदिका कल्पना साठे यांनी केले. आभार जि.प.सदस्य भानुदास गायकर यांनी मानले.


प्रिंट काढा