Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत   Deshdoot Times
 जि.प.,पं.स.साठी आज मतदान    मनपाच्या चाळीस उमेद्वारांना नोटिसा   Updated on February 7, 2012, 01:36:34 hrs



मुख्य पान | ‘कोलावरी-डी’ च्या यशानंतर आता ‘यु आर अवर बुस्ट...’ सचिनला समर्पित!
‘कोलावरी-डी’ च्या यशानंतर आता ‘यु आर अवर बुस्ट...’ सचिनला समर्पित!
मुंबई, (वृत्तसंस्था) -(05-February-2012)
Tags : Jalgaon,Dhule,Nandurbar
 

कोलावरी डी’च्या अभुतपूर्व यशानंतर अभिनेता-गायक धनुष याचे नवीन गाणे लवकरच येत आहे. विशेष म्हणजे हे गीत त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला समर्पित केले आहे. ‘यु आर अवर बुस्ट...!’ असे या गाण्याचे बोल आहेत. धनुष याला गेल्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध शक्तिवर्धक पेय ‘बुस्ट’ कंपनीकडून प्रस्ताव मिळाला होता. ’बुस्ट’ या पेयासाठी त्याने गाणे तयार करावे, अशी कंपनीची डीमांड होती. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर गेल्या अनेक वर्षांपासून ‘बुस्ट’ या कंपनीचा एम्बेसडर आहे. ‘बुस्ट’साठी जरी हे गाणे तयार केले असले तरी ते सचिनला समर्पित असल्याचे धनुष म्हणाला. ’कोलावरी डी’ प्रमाणेच ’यु आर अवर बुस्ट...’लाही प्रसिद्धी मिळेल, अशी आशा ही त्यांनी व्यक्त केली आहे. ’कोलावरी डी’चे गीतकार आणि संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांनीच या नव्या गाण्याची रचना केली आहे. या गाण्यासाठी ’कोलावरी डी?’ ची सर्व टीम परिश्रम घेत आहे.


प्रिंट काढा