इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) पाचव्या मोसमासाठी युवराज सिंगच्या ऐवजी दुसरा खेळाडू मिळावा, ही मागणी सहाराने केली होती. पण ती मागणी ङ्गेटाळून लावल्याने कंपनीने तडकाङ्गडकी हे पाऊल उचलले आहे. बीसीसीआय अंतर्गत होणार्या सर्व क्रिकेट सामन्यांपासून आपण संबंध तोडत आहोत, अशी घोषणा सहाराच्या वतीने करण्यात आली.
आयपीएलच्या पाचव्या मोसमासाठी शनिवारी होत असलेल्या लिलावापूर्वी सहाराने हा निर्णय घेत सर्वांनाच मोठा झटका दिला. पुणे वॉरियर्सचा कर्णधार युवराज सिंह याच्यावरून बीसीसीआय आणि सहारामध्ये वाद झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. युवराजवर सध्या उपचार सुरु असून, बीसीसीआयकडून त्याच्याबाबत सहानभूती दाखवणे आवश्यक असल्याचे सहाराने म्हटले होते.
प्रायोजकत्व रद्द करण्याचा निर्णय घेत बीसीसीआयला आयपीएलमधील पुणे वॉरियर्स या संघाची मालकी तात्काळ अन्य इच्छुक कंपनीकडे सोपवावी, अशी विनंती सहाराने बीसीसीआयकडे केली आहे. तसेच त्यांनी बीसीसीआय अंतर्गत येणार्या सर्व प्रकारच्या क्रिकेट संघांचे प्रायोजकत्व रद्द करीत असल्याचे म्हटले आहे. यापुढे टवेंटी-20 किंवा कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटला प्रायोजकत्व देणार नसल्याचे, सहाराने स्पष्ट केले आहे.
सहारा इंडिया आणि बीसीसीआयमधील प्रायोजकत्वाचा करार 2010 मध्ये संपल्यानंतर पुन्हा चार वर्षांसाठी प्रायोजकत्वामध्ये वाढ करण्यात आली होती. यासाठी सहारा इंडिया 450 कोटी रुपये मोजले होते. युवराज सिंह सध्या ङ्गुफ्ङ्गुसाच्या विकाराने त्रस्त आहे. त्याची प्रकृती ही आमचे प्राधान्य आहे, त्यामुळे त्याला या वर्षीचे पूर्ण मानधन देण्यात येईल, असे सहाराने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी खेळाडूंचा लिलाव ठरल्याप्रमाणेच होणार असल्याचे स्पष्ट केले. सहाराच्या निर्णयाचा लिलावावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
टीम इंडियासाठी नवा प्रायोजक मिळवण्यासाठी बीसीसीआयला दोन ते चार महिने वेळ लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत सहाराच संघाच्या प्रायोजकत्वाचा खर्च उचलणार आहे.
त्रिकोणीय मालिका : विश्र्व चॅम्पियन पहिल्या युद्धासाठी तयार
मेलबर्न - निराशाजनक दौर्यावर पहिल्या विजयाने उत्साहित भारत त्रिकोणीय एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात उद्या जेव्हा ऑस्ट्रेलियाचा सामना करेल तेव्हा त्याचे ध्येय टी-20 चा लय एकदिवसीय क्रिकेटमध्ये कायम ठेवण्याचे राहील. गेल्यावर्षी भारताने 28 वर्षाचा दुष्काळ समाप्त करून विश्व चॅम्पियनचा दर्जा प्राप्त केला होता परंतु तरी देखील एकदिवसीय रँकिंगमध्ये मुख्यस्थानी पोहचु शकला नाही, यावेळी टीम इंडिया कसोटीचा पराभव विसरून इतर संघाना दाखवेल की, आखेर का तो विश्व चॅम्पियन आहे.
कसोटी मालिकेत 0-4 चा लाजीरवाणा पराभव व पहिल्या टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाद्वारे पराभुत झाल्यानंतर भारताने काल यजमान संघाला दुसर्या टी-20 सामन्यात आठ गडी राखुन पराभुत करून सध्याच्या दौर्यावर पहिल्या विजयाचा आस्वाद घेतला. आतापर्यंत संघर्ष करणार्या भारतीय संघाला सुरेश रैना, रवींद्र जडेजा व राहुल शर्मा सारखे तरूण खेळाडू आल्यामुळे शक्ती मिळाली. मैदानावर भारतीय संघाच्या प्रदर्शनात खुप सुधारणा झाली असून टीम इंडिया अपेक्षा करेल की, हा लय एकदिवसीय सामन्यातही कायम राहावे. संघात वरिष्ठ खेळाडूंची उपस्थिती राहील व सचिन तेंडुलकरला पुन्हा एकदा अंतिम एकादशमध्ये सहभागी होण्याची अपेक्षा आहे. शंभरावे अंतरराष्ट्रीय शतकाच्या उंभरठ्यावर उभे असलेल्या तेंडुकलरने ही उपलब्धी प्राप्त करण्यासाठी त्रिकोणीय मालिकेत खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तेंडुलकरने अंतिम एकादशमध्ये पुनरागमन केल्यामुळे रविचंद्रन अश्विन किंवा प्रतिभावान लेग स्पिनर राहुल शर्माला मेलबर्न क्रिकेट मैदानात पहिल्या सामन्यात बाहेर बसावे लागेल. अश्विन व राहुल दोघांनी ट्वेंटी-20 सामन्यात खुप चांगली कामगिरी केली आहे. राहुल आपल्यापेक्षा अनुभवी स्पिन जोडीदार अश्विनवर थोडा भारी पडला. अश्विनने प्रती षटक 7.12 धावा देऊन ङ्गक्त एक बळी चटकावला जेव्हा की, राहुलने 7.63 धाव प्रति षटक देऊन तीन बळी चटकावले. अश्विन राहुलच्या तुलनेत चांगला ङ्गलंदाज आहे. ऑस्ट्रेलियाचा ट्वेंटी-20 कर्णधार जार्ज बेलीनेही राहुलचे कौतुक केले कारण सहा ङ्गुट तीन इंचची उंची असल्यामुळे या लेग स्पिनरला एमसीजीच्या सपाट खेळपट्टीवर खुप चड-उतार मिळत होता व त्याविरूद्ध धावा बनवणे सोपे नव्हते. भारत जर दोन्ही स्पिनरांना संधी देऊ इच्छित असेल तर त्याला एक ङ्गलंदाज कमी करावे लागेल व अशात रोहित शर्माला बाहेर राहावे लागेल. तेंडुलकरच्या पुनरागमनामुळे मुख्य क्रमाला शक्ती मिळेल. गौतम गंभीर व वीरेंद्र सेहवागने मागील सामन्यात चांगले प्रदर्शन केले होते परंतु तेंडुलकरच्या पुनरागमनानंतर कसोटी संघाच्या या दोन्ही नियमित सलामीवीरपैकी एकाला ङ्गलंदाजी क्रमात खाली राहावे लागेल. तीसर्या क्रमावर गंभीरचे रेकॉर्ड चांगले आहे व त्याने विश्वचषकाच्या अंतिम लढतीत याच स्थानावर उतरून 91 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली होती. कर्णधार महेंद्र सिंह धोनीनेही पहिल्या दोन ट्वेंटी-20 सामन्यात 48 व 21 धावांची नाबाद खेळी खेळुन लयात परतण्याचे संकेत दिले. क्लार्कने म्हटले, ’भारतीय संघाने काल ज्याप्रकारे चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केले, त्यावर मला कोणतेही आश्र्चर्य झाले नाही. या संघात काही चांगले खेळाडु आहेत. या एकदिवसीय मालिकेमुळे क्रिकेट प्रेमींमध्ये येथे खुप उत्साह दिसत आहे. जर तुम्ही भारत व श्रीलंका सारख्या बळकट संघाविरूद्ध खेळत असाल व मी क्रिकेट प्रेमी असेल तर माझीही इच्छा हा रोमांचने भरपुर असलेला सामना पाहण्याची असेल.
|