|
| राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत राडा |
|
| nashik(05-February-2012) |
Tags : Nashik,Maharashtra,NCP, beating, fight, affray, crime |
नाशिक महापालिका निवडणुकीची अर्ज माघारीची आज अंतिम मुदत होती. त्यामुळे मध्य नाशिक, मनपा पूर्व विभागात दिवसभर तणावपूर्ण वातावरण होते. दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मेनरोडवर उमेदवारीवरून राडा झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष गजानन शेलार व पक्षाचे नगरसेवक संजय चव्हाण यांच्या समर्थकांमध्ये वाद होऊन प्रकरण हातघाईवर आल्याने पोलिसांना हस्तक्षेप करुन सौम्य लाठीमार करावा लागला.
याबाबत समजलेली माहिती अशी की, विद्यमान नगरसेवक संजय चव्हाण व विनायक (नय्या) खैरे यांच्यासह शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी प्रभाग क्रमांक २९ मधून पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. आज अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी पक्षाने खैरे यांना उमेदवारी बहाल केली. त्यामुळे संजय चव्हाण यांनी या प्रभागातून दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला. परंतू प्रभाग ५४ मधून दाखल केलेला अपक्ष अर्ज मागे घेतला नाही. आज अर्ज माघारी आणि पक्षाचे अधिकृत ए.बी. फॉम जमा करण्याची शेवटची मुदत दुपारी (पान ८ वर)
|
प्रिंट काढा |
|
|
|