Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत   Deshdoot Times
 जि.प.,पं.स.साठी आज मतदान    मनपाच्या चाळीस उमेद्वारांना नोटिसा   Updated on February 7, 2012, 01:36:34 hrs



मुख्य पान | एस.टी.कडून २० लाखांची सूट एक कोटीचा निधी मागणार
एस.टी.कडून २० लाखांची सूट एक कोटीचा निधी मागणार
nashik(05-February-2012)
Tags : Nashik,Maharashtra,incomplete fund, zilla council
 

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मिळालेला निधी अपुरा पडत आहे. म्हणून आणखी एक कोटी रुपये मिळावे, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पहिल्या दोन टप्प्यात जिल्हा प्रशासनाला ३ कोटी १४ लाख रुपये मिळाले होते. तर आज १ कोटी ८५ लाख मिळाले. असे एकूण ४ कोटी ९९ लाख रुपये निवडणुकीसाठी मिळाले आहेत. संपूर्ण निवडणूक खर्च ६ कोटींवर जाणार असल्याने आणखी एक कोटीची मागणी करण्यात येणार आहे. मिळालेल्या निधीपैकी सुमारे २ कोटी १० लाख रुपये निवडणूक कर्मचारी व पोलिसांना मानधनासाठी लागणार आहेत. ३९९ बसेससाठी जिल्हा प्रशासनाला ७७ लाख ३५ हजार रुपये खर्च आला. तरी जिल्हा प्रशासनाच्या विनंतीस मान देऊन त्यांनी खोळंबा व हॉल्ट चार्जेस लावले नाही. म्हणून सुमारे २० लाख रुपये प्रशासनाचे वाचले आहेत. जिल्हा प्रशासनाने पूर्वीच ८ कोटी ६७ लाख रुपयांच्या निधीची मागणी केली होती. मात्र त्यांना ४ कोटी ९९ लाख रुपये मिळाल्याने आणखी १ कोटी रुपये मिळावे, अशी मागणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ३ हजार ७७४ मतदान केंद्रे तयार करण्यात आली असून एका मतदान केंद्राला सुमारे ४ हजार ८०० रुपये खर्च येणार आहे. कर्मचारी व पोलिसांचे मानधन मतदान होताच अदा करण्यात येणार आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज विक्री तसेच मतदार याद्यांच्या विक्रीच्या माध्यमातून जमा झालेली रक्कम शासन जमा करण्यात येणार आहे.


प्रिंट काढा