|
|
|
|
| मुख्य पान | महिला पोलिसाचा छळ; पतीविरुद्ध गुन्हा |
| महिला पोलिसाचा छळ; पतीविरुद्ध गुन्हा |
|
| nashik(05-February-2012) |
Tags : Nashik,Maharashtra,crime, beating |
कर्ज फेडण्यासाठी पैशाची मागणी करून मारहाण करून घरातून हाकलून दिल्या प्रकरणी एका महिला पोलिसाच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिसांनी आरोपी पती पंडित रंगनाथ कातड याच्याविरुध्द विवाहितेच्या छळाचा गुन्हा दाखल केला आहे.
पंचवटी पोलिसांनी महिला पोलीस धनश्री पंडित कातड (रा. पेठरोड जकातनाक्याजवळ, पंचवटी) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार आज (दि.४) दुपारी घडला. याबाबत पंचवटी पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी महिला पोलीसाने फिर्यादीत म्हटले आहे, पती पंडित कातड यांनी शेतजमिनीवर काढलेले कर्ज फेडण्यासाठी पैसे आणावेत अशी मागणी करून आपल्याला मारहाण केली आणि घरातून काढून दिले. यावरून पोलिसांनी आरोपी पंडित रंगनाथ कातडविरुध्द भादंवि कलम ४९८(अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदाम वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
पगार न देता मोलकरणीला मारहाण
महात्मानगर भागात एका मोलकरणीला पगार न देता धमक्या देऊन मारहाणीचा प्रकार घडला. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी आरोपी समिना कामराज शेख (रा. स्पेश मर्म्युरी प्लॅट नं. ११ महात्मानगर ) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत छाया अंबादास हिवाळे (रा. संत कबीरनगर भोसला शाळेच्या पाठीमागे) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार २८ जानेवारी रोजी दुपारी घडला. यातील फिर्यादी महिला आरोपी महिलेकडे धुण्या-भांड्याच्या कामाला असतांना तिला कामाचा पगार दिला नाही. पगाराची मागणी केली म्हणून तिला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. जिल्हा घरकामगार मोलकरीण संघटनेने या गंभीरप्रकाराबाबत गंगापूर पोलिसांना निवेदन देऊन यात एका पोलिसाचा सहभाग असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर गंगापूर पोलिसांनी संबंधीत महिलेविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक राजश्री गांधी करीत आहेत.
धनादेश फसवणूक : एकास कारावास
बँक खात्यात पैसे नसतांना कर्जपोटी छत्रपती नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था नाशिक या पतसंस्थेची धनादेश देऊन फसवणूक केल्याच्या खटल्यातील आरोपी शैलेश मुरलीधर करवॉं (रा. कामटवाडे, नवीन नाशिक) यांना न्या. श्रीमती एस. टी. दंडे यांनी २ महिने कारावास व ७० हजार रुपयांची भरपाई देण्याची शिक्षा ठोठावली. यात आरोपीने १६ फेब्रुवारी २०१२ पर्यत ३५ हजार व १६ मार्च २०१२ पर्यत ३५ हजार रुपये भरावेत दंड न भरल्यास परत ६ महिने कारावासाची शिक्षा असे या निकालात न्यायालयाने नमूद केले आहे. यात पतसंस्थेच्या वतीने ऍड. दत्ता संपत निकम यांनी काम पाहिले.
|
प्रिंट काढा |
|
|
|