|
| साक्षीदाराने आरोपींना ओळखले |
|
| अहमदनगर, दि. 8 (प्रतिनिधी)- (09-February-2010) |
Tags : Ahmednagar,Crime,Regional |
बुरूडगाव रोड येथे रमेश व चित्रा मुनोत यांच्या खूनप्रकरणाची सुनावणी पुन्हा जिल्हा न्यायालयात सुरू झाली आहे. या खटल्यातील मुख्य साक्षीदार सुमित तिवारी यांची अतिरिक्त सत्र न्यायाधीश मकरंद केसकर यांच्यासमोर सरतपासणी झाली तिवारी यांनी या गुन्ह्यातील आरोपी आणि त्याला घटनेच्या वेळी तोंडाला चिकटविलेल्या चिकटपट्ट्या आणि इतर साहित्य ओळखल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. उद्या (दि.9) तिवारी यांची उलटतपासणी होणार आहे.
डिसेंबर महिन्यात बुरूडगाव रोड येथे बत्तीन बिहार या बंगल्यात आरोपींनी रमेश आणि चित्रा मुनोत यांची हत्या केली होती. या घटनेतील रखवालदार सुमित तिवारी हा मुख्य साक्षीदार आहे. त्याची न्यायालयात आज दि. 8 रोजी सुनावणी झाली. तिवारी हा उत्तरप्रदेशचा असून तो ऑ्नटोबर 2009 मध्ये पुण्यात येऊन एका ठेकेदाराच्या माध्यमातून तो नगरमध्ये बंगल्यावर रखवालीसाठी आला. बुरूडगाव रोड येथील मुनोत यांच्या बंगल्यात शिवकुमार सांकेत हाही होता. हे दोघे कामकाजाची वेळ दिवस-रात्रपाळीनुसार ठरवून घेत होते. 2 डिसेंबर रोजी दुपारी एक जण बंगल्याची पाहणी करून गेला होता. रात्री तिवारी यांची ड्यूटी असताना एक जण आल्यावर मालकाला भेटायचे असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार तिवारी याने मालकाला विचारतो असे सांगून इंटरकॉमवर रमेश मुनोत यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच वेळी एकाने तिवारी यांना पकडून लगेचच इतरांनी त्यांचे हात पाय बांधून तोडाला चिकटपट्ट्या लावल्या. त्यामुळे तिवारी यांना आरडाओरड करण्याची संधीच मिळाली नाही. तर दुसरीकडून इतरांनी रमेश आणि चित्रा यांची हत्या करून बंगल्यातून रोकड आणि मोबाईल लांबविला होता. या सर्व प्रकारातून तिवारी यांनी हालचाल करून पुन्हा रमेश मुनोत यांना इंटरकॉमवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु आतमध्ये मुनोत यांची हत्या झाल्याने प्रतिसाद मिळाला नाही. पहाटे बंगल्यातून बाहेर आल्यावर त्यांना गुंदेचा यांच्या बंगल्यातील रखवालदार दिसल्यावर त्याने हात पाय सोडण्याची विनंती केली, परंतु त्यानेही प्रथम मालकाला विचारून येतो असे सांगून तो गेला.
गुंदेचा यांना रखवालदाराने सांगितलेल्या महितीनुसार बाहेर आल्यावर त्यांनी हा प्रकार पाहून बंगल्यातील मुनोत यांच्या रूमकडे गेल्यावर मुनोत दाम्पत्याची हत्या झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी आरोपींना पकडल्यावर जप्त केलेल्या चिकटपट्ट्या, मोबाईल आणि इतर साहित्य तिवारी यांनी ओळखले. यावेळी सरकारी वकील विवेक म्हसे यांनी तिवारी यांची सरतपासणी घेतली. ही सुनावणी दुसर्या दिवशीही सुरू राहणार दि.9 रोजी उलटतपासणी होणार आहे. |
प्रिंट काढा |
|
|
|