Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 आयसीसीची स्पॉटफिक्सर खेळाडूंवर तात्पुरती बंदी   वाळूतस्करांना दणका; 5 कोटींचा दंड!   पोलिसांचे धरपकडसत्र; 9 आरोपी जेरबंद   जवळकेत शेतकरी आत्महत्या   मास्टरब्लास्टर झाला हवाई दलाचा ग्रुप कॅप्टन   पिंपरीत एकतर्फी प्रेमातून तरुणीचा खून   सोनिया कॉंग्रेसच्या ‘विक्रमी’ अध्यक्षा   अपहृत पोलिसांच्या शोधासाठी मोहीम तीव्र   Updated on September 4, 2010, 19:35:55 hrs

मुख्य पान | तंटामुक्त मोहिमेत श्रीगोंदा-पारनेर आघाडीवर
तंटामुक्त मोहिमेत श्रीगोंदा-पारनेर आघाडीवर
अहमदनगर, दि. 8 (प्रतिनिधी)- (09-February-2010)
Tags : Ahmednagar,Regional,Political,Maharashtra
 

महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम आता अंतिम टप्प्यात आली आहे. 83 हजार 338 दाखल तंट्यांपैकी 5 हजार 951 तंटे निकाली निघाले आहेत. श्रीगोंदा आणि पारनेर तालु्नयात हे अभियान अधिक प्रभावी ठरले तर कोपरगाव तालु्नयात प्रशासन आणि तंटामुक्त समितींच्या समन्वय अभावामुळे अल्प तंटे निकाली निघाली आहेत. नगर जिल्ह्यात 14 तालु्नयांतर्गत 22 पोलिस ठाण्यांचा समावेश असून या पोलिस ठाण्यांच्या माध्यमातून तंटामुक्त गाव अभियान जिल्हा प्रशासनाकडून राबविले जात आहे. जिल्ह्यातील 1 हजार 311 गावांपैकी 1 हजार 299 गावांमध्ये तंटामुक्त गाव समित्या स्थापन करण्यात आली आहे. या समित्यांनी जिल्ह्यात 83 हजार 338 दाखल तंटे निकाली काढण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समितींनी बैठक घेऊन मार्गदर्शन केले आहे. तालुका स्तरावर 58 तर पोलिस ठाणे स्तरावरील समित्यांनी 104 बैठका घेऊन मार्गदर्शन केल्याने गत दोन वर्षांपेक्षा चालू वर्षी हे अभियान जिल्ह्यात अधिक प्रभावी ठरले असल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात 18 हजार 938 दिवाणी, 1 हजार 699 महसुली, फौजदारीमध्ये 48 हजार 012 दखलपात्र, 11 हजार 921 अदखलपात्र तंटे, तर इतर मध्ये 2 हजार 768 असे 83 हजार 338 तंटे दाखल झालेले होते. त्यामध्ये प्रशासनाने आणि तंटामुक्त समित्यांनी युध्द पातळीवर मोहीम राबविल्याने 27 दिवाणी, 352 महसुली, 29 दखलपात्र, 4 हजार 345 अदखलपात्र, इतर 1 हजार 198 असे 5 हजार 951 तंटे निकाली काढण्यात यश आले असून एकूण 7.14 शेकडा टक्केवारीनुसार तंटे निकाली निघाली आहेत. तंटामुक्त अभियानात पालकमंत्री बबनराव पाचपुते यांचा मतदारसंघ असलेल्या श्रीगोंदा तालु्नयात 1 हजार 19 तर पारनेर तालु्नयात 1 हजार 271 तंटे निकाली निघाले आहेत. ही दोन तालुके जिल्ह्यात आघाडीवर आहेत. तर कोपरगाव तालु्नयात सर्वात कमी म्हणजे 19 तंटे निकाली निघाली आहेत. तंटामुक्त समित्या आणि प्रशासनाच्या समन्वय अभावामुळे या तालु्नयात अल्प तंटे निकाली निघाली आहेत. या अभियानाला अधिक गतिमानता येण्यासाठी आता अवघ्या तीन महिन्यांचा कालावधी राहिला आहे. या कालावधीत जिल्ह्यातील तंटे अधिकाधिक निकाली काढण्यासाठी युध्द पातळीवर मोहीम हाती घेण्यात येणार असल्याने आता तंटामुक्त समित्यांना-प्रशासनाला गावपातळीवर नागरिकांनी सहकार्य करावे अशीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


प्रिंट काढा