पुणतांबा (वार्ताहर)- पुणतांबा येथे गावातील डुकरे मोठ्या प्रमाणात मरत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय अधिकार्यांच्या पथकाने मृत डुकरांचे शवविच्छेदन करून नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. इतर जनावरे न मरता फक्त डुकरेच का मरताहेत? असा प्रश्न निर्माण झाल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे.
पुणतांबा येथे गावातील डुकरे मोठ्या प्रमाणावर मरत असल्याचे नागरिकांना आढळून आले असता त्यांनी ग्रामपंचायतीच्या आरोग्य विभागातील कर्मचार्यांच्या निदर्शनास आणून दिले, त्यानंतर आयोग्य विभागाच्या कर्मचार्यांनी रोज 10 ते 12 डुकरे गावातून मैलावाहतूक करणार्या बैलगाडीतून वाहून नेवून गावाच्या बाहेर नेवून पुरली होती. |