Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 साडेनऊशे गावांवर पाणीटंचाई ‘ढग’   राम ताकवलेंना आज गोदावरी गौरव    सटाणा, सिन्नर, त्र्यंबक, वणी नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर   शेती औजार खरेदीही संशयास्पद   नाराज होईल त्या दिवशी मंत्रिमंडळातून बाहेर पडेन - कदम   सचिन सर्वात प्रभावशाली व्य्नितमत्त्व   युवासाठी आयपीएल वरदान - धोनी   ..तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल ः आ. कर्डिले   पत्नी, मुलाच्या हत्येप्रकरणी पतीस जन्मठेप   लोकन्यायालयात 39 प्रकरणे निकाली   रोजगार निर्मितीसाठी कालबद्ध कार्यक्रमांची अंमलबजावणी ः ना. विखे   सेवाभावी वृत्ती जोपासल्यास समाजात मान मिळतो ः कवाद   कुकडीचे उन्हाळी आवर्तन सोडा ः म्हस्के   बोधेगावच्या घरकुल लाभार्थींचे उपोषण आश्वासनानंतर मागे    पंतप्रधान म्हणाले, शेवट गोड झाला!    सात गोंधळी खासदार निलंबित   मराठी माणसाशी प्रतारणा नाही ः राज    महिला शिक्षिकांना सहा महिन्यांची प्रसूति रजा    ‘त्या’ पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदल्या करा ः गोरे    मलिक यांची पुन्हा भारतावर चिखलफेक    विरोधकांनी हुकूमशाहीची भाषा करू नये ः मुख्यमंत्री   विदर्भाला विरोध करणार्‍यांनी गृहपाठ करावा ः देशमुख   पाणी योजनेची निविदा 72 ट्नके वाढीव दराने   ‘महिला बालकल्याण’च्या सभेत गोंधळ   आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य शिबिर    राष्ट्रवादीची शहर जिल्हा कार्यकारिणी जाहीर    ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या कारखान्यांना भेटी   बारावी अर्थशास्त्र विषयाची उत्तरपत्रिका पळविली   26/11 हल्ला पाक पुरस्कृत    नगरपालिकांचे आरक्षण जाहीर    राज्यसभेत इतिहास घडला...   कर्जतचे सरपंच, उपसरपंच अपात्र   Updated on March 10, 2010, 12:01:15 hrs

मुख्य पान | आगामी काळात पाणी नियोजनाची गरज
आगामी काळात पाणी नियोजनाची गरज
संगमनेर, दि. 6 (प्रतिनिधी)(07-February-2010)
Tags : Ahmednagar,Agricultural,Regional,International,Maharashtra
 

- जर्मनीमध्ये पाणी मुबलक स्वरूपात उपलब्ध आहे. भारतात मात्र पाण्याची कमतरता असल्याने पाणी हे एखाद्याच्या आयुष्यात किती कठीण प्रसंग निर्माण करू शकते, हे जर्मनीत राहून समजू शकले नसते. यापुढील काळात पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष डॉ. हॉर्स्ट कोहलर यांनी केले. राष्ट्राध्यक्ष डॉ. कोहलर आज भारत भेटीवर आले असता त्यांनी संगमनेर तालु्नयातील दरेवाडी या गावास भेट दिली. तसेच, तेथील पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामाची पाहणीदेखील केली. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी इव्हा ल्युईस कोहलर, जर्मनीच्या अर्थमंत्री गुडरन कॉफ, नाबार्डचे अध्यक्ष उमेशचंद्र सरंगी, राज्याचे कृषिमंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हाधिकारी डॉ.पी.अन्बलगन, पोलिस अधीक्षक विजय चव्हाण यांच्यासह जर्मनीचे अधिकारी उपस्थित होते. राष्ट्राध्यक्ष डॉ. कोहलर यांचे सकाळी 11 वाजता दरेवाडी येथे उभारण्यात आलेल्या हेलिपॅडवर आगमन झाले. त्यानंतर त्यांनी पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत वॉटर संस्थेने केलेल्या कामांची पाहणी केली. येथील गायकवाड वस्तीवर त्यांनी गावकर्‍यांशी संवाद साधला. तसेच, दरेवाडी येथे प्राथमिक शाळेच्या आवारात घेण्यात आलेल्या ग्रामसभेतदेखील त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना कोहलर म्हणाले, की येथील लोकांनी ज्या पद्धतीने सन्मान केला, आदरातिथ्य केले, त्यामुळे भारावून गेलो. कार्यक्रमस्थळी काढण्यात आलेली रांगोळी आवडल्याचे नमूद करीत या भेटीने दोन राष्ट्रांतील मैत्री वृद्धींगत होण्यास मदत होणार आहे. पाणी हे जीवन आहे. हे तत्त्वज्ञान फादर बाकर यांनी सांगितले. लोकसहभागातून विकासाला चालना मिळू शकते हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. त्यांच्या कामाची पाहणी केल्यानंतर समाधानी झालेल्या राष्ट्राध्यक्षांनी बाकर यांना पत्र लिहून भावना कळविणार असल्याचे सांगितले. अर्थमंत्री गुडरन कॉफ म्हणाल्या, की हेलिकॉप्टरमधून येताना हा भाग हिरवागार दिसला. पाणलोट क्षेत्र विकासाच्या कार्यक्रमातून हे यश साध्य झाले. त्यामुळे आर्थिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे बदल घडण्यास मदत झाली. या पाणलोट विकास कार्यक्रमामुळे यापुढील काळात येथील लोकांना चांगले भवितव्य असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.


प्रिंट काढा