|
|
|
|
| मुख्य पान | जि.प., पं.स. निवडणुकीसाठी सवलतीस एस.टी.चा नकार |
| जि.प., पं.स. निवडणुकीसाठी सवलतीस एस.टी.चा नकार |
|
| nashik(03-February-2012) |
Tags : Nashik,Maharashtra,zilla council election 2012 |
सात तारखेला जिल्ह्यात होणार्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी निवडणूक साहित्य आणि कर्मचार्यांची मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी लागणार्या एसटीच्या भाड्यात सवलत देणे अशक्य असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले.
एस.टी. महामंडळाकडून विविध शासकीय कामांबरोबरच खासगी प्रवासी वाहतुकीसाठी प्रासंगिक करारावर बसगाड्या उपलब्ध करून दिल्या जातात. जिल्ह्यात होणार्या निवडणुकीच्या कामकाजात निवडणूक आयोगाकडून या बसगाड्यांची कर्मचारी आणि निवडणूक साहित्य यांची वाहतूक करण्यासाठी मदत घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या मतदान केंद्रांपर्यत हे साहित्य आणि कर्मचार्यांना वेळेत पोहोचविण्यासाठी निवडणूक विभागाने ४२१ बसेसची मागणी केली आहे. या बसेससाठी आकारण्यात येणार्या खोळंबा आकार आणि इतर शुल्कात महामंडळाने सवलत देण्याची मागणी निवडणूक विभागाने केली होती. मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या प्रासंगिक करारावर द्यावयाच्या सवलतीमध्ये केवळ शैक्षणिक सहलींसाठीच सवलत देण्याची तरतूद आहे. त्यामुळे निवडणूक विभागाला यासाठी कोणत्याही प्रकारची सवलत देता येणार नसल्याचे अधिकार्यांकडून सांगितले जात आहे. महामंडळाकडून पुरविण्यात येणार्या बसगाड्यांसाठी कमीत कमी शंभर किमी अंतरासाठी ६ हजार २०० रुपये शुल्क आकारले जाते. त्यानुसारच गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे विभाग नियंत्रक के.बी.देशमुख यांनी सांगितले.
|
प्रिंट काढा |
|
|
|