Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत   Deshdoot Times
 जि.प.,पं.स.साठी आज मतदान    मनपाच्या चाळीस उमेद्वारांना नोटिसा   Updated on February 7, 2012, 01:36:34 hrs



मुख्य पान | दाऊदचे लक्ष्य आता पुणे सेफ लॅण्ंिडगसाठी पुणे विमानतळाचा वापर
दाऊदचे लक्ष्य आता पुणे सेफ लॅण्ंिडगसाठी पुणे विमानतळाचा वापर
पुणे, दि. २ (प्रतिनिधी) -(03-February-2012)
Tags : Maharashtra,Crime News,Dawood Ibrahim, pune
 

पुणे, दि. २ (प्रतिनिधी) - दाऊद इब्राहिमने सोन्याच्या तस्करीसाठी मुंबईपाठोपाठ आता पुण्याचा आधार घेतला आहे. दुबई आणि आखातामधील सोने मुंबईत उतरविण्यास अनेक अडचणी येत असल्याने ‘सेफ लॅण्ंिडग झोन’ म्हणून पुण्याचा वापर केला जात असल्याचे दिसते. कस्टम विभागाने गेल्या तीन महिन्यांत तीन गुन्हे दाखल करत पुणे विमानतळावरून सुमारे एक कोटी रुपयांचे सोने जप्त केल्याने या कारवायांचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या नुकत्याच झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत या घटनेची माहिती देण्यात आली. सोन्याच्या तस्करीसाठी भटकळ (जिल्हा उत्तर कन्नड, कर्नाटक) आणि मुंबई येथील व्यक्तींचा वापर केला गेला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) तसेच पुणे पोलिसांनी पुणे एअरपोर्टवर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती एका उच्चपदस्थ अधिकार्‍याने दिली. कस्टम विभागाला दुबई आणि आखातातून आलेल्या विमानामधील काही व्यक्तींनी लाखो रुपयांचे सोने आणल्याचे लक्षात आले होते. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे दिली. कस्टम विभागाने महसूल खात्याच्या गुप्तचर यंत्रणेमार्फत (डीआरआय) संबंधित व्यक्तींची चौकशी केली होती. या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य असताना त्यांनी एवढे लाखो रुपयांचे सोने कसे आणले, असा प्रश्न पुढे आला होता. कस्टम आणि डीआरआयच्या चौकशीत हे सोने आणि त्यामागील ऑपरेटर्स डी गँगचे असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. संबंधित व्यक्तींना हे सोने भारतात पोहोचविण्यासाठी ५० हजार रुपये देण्यात येणार होते, असेही त्यांनी तपास यंत्रणांपुढे कबूल केले.


प्रिंट काढा