Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत   Deshdoot Times
 जि.प.,पं.स.साठी आज मतदान    मनपाच्या चाळीस उमेद्वारांना नोटिसा   Updated on February 7, 2012, 01:36:34 hrs



मुख्य पान | जहाज बुडाले; अनेकांना जलसमाधी
जहाज बुडाले; अनेकांना जलसमाधी
मेलबर्न, दि. २ (वृत्तसंस्था) -(03-February-2012)
Tags : International,Melbourne, Papuo Guinea, Ferry with 350 aboard sinks off Papua New Guinea
 

मेलबर्न, दि. २ (वृत्तसंस्था) - पापुआ न्यू गिनिआच्या उत्तरेकडील तटाजवळ ३५० प्रवाशांना घेऊन जाणारे एक जहाज बुडाले. या अपघातामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान जुलीया गिलार्ड यांनी गुरुवारी व्यक्त केली. ३५० प्रवाशांना घेऊन जाणारे एक जहाज पापुआ न्यू गिनीआजवळ बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही फार मोठी दुर्घटना असून, यामध्ये अनेकांचा बळी जाण्याची शक्यता आहे असे गिलार्ड यांनी ऑस्ट्रेलियातील वृत्तसंस्थेला सांगितले. अपघातानंतर बचाव पथकाने २८ प्रवाशांना वाचवले असून, कित्येकजण पाण्यातच अडकल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. मदत व बचाव कार्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारने चार मोठी जहाजे घटनास्थळी पाठवली असून, मदतकार्य सुरू होते.


प्रिंट काढा