Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत   Deshdoot Times
 जि.प.,पं.स.साठी आज मतदान    मनपाच्या चाळीस उमेद्वारांना नोटिसा   Updated on February 7, 2012, 01:36:34 hrs



मुख्य पान | घनकचरा वाहतूक खासगीकरणाचे मुसळ केरात
घनकचरा वाहतूक खासगीकरणाचे मुसळ केरात
अहमदनगर, दि. २ (प्रतिनिधी) (03-February-2012)
Tags : Ahmednagar,Municipal corporation Ahmednagar
 

अहमदनगर, दि. २ (प्रतिनिधी) - शहरातील कचरा वाहतूक व संकलनाच्या खासगीकरणाचा ठेका महापालिका प्रशासनाने अचानक रद्द केल्यामुळे आता दोनदा निविदा मागवूनदेखील एकही निविदा सादर होत नसल्याने खासगीकरणाचे मुसळ केरात जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे. शहरातील कचरा वाहतूक व संकलन महापालिकेमार्फत कण्यात येत आहे. त्याचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला व एक वर्षापूर्वी ते करण्यातही आले. एका ठेकेदाराने घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे व वाहतूक करण्याचा ठेका घेतला. महापालिकेने संबंधित संस्थेस कार्यारंभ आदेशही दिला. परंतु अचानक महापालिकेने ठेका रद्द केला. त्यामुळे सध्या महापालिकाच कचर्‍याची वाहतूक करत आहे. महापालिकेवर ताण पडत असल्याने पुन्हा खासगीकरण करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार संकलन आणि वाहतुकीसाठी खासगी ठेकेदाराची नियुक्ती करण्यासाठी ऑनलाईन निविदा मागविण्यात आल्या. पहिल्यावेळी एकही निविदा आली नाही. परिणामी दुसर्‍यांदा निविदा मागविल्या गेल्या. त्या आज गुरुवारी उघडण्यात आल्या; परंतु त्यात दोन निविदा सादर झाल्या असल्याची नोंद आहे. परंतु प्रत्यक्षात एकही निविदा उघड झाली नाही. त्यामुळे तिसर्‍यांदा निविदा मागविण्याची नामुष्की ओढवली गेली आहे. शहरातील कचरा वाहतूक करण्यासाठी महापालिकेने उभी केलेली यंत्रणा जुनी झाली आहे. नवीन यंत्रणा उभी करण्याचा खर्चदेखील मोठा आहे. नव्याने यंत्रणा उभी करण्यापेक्षा त्याचे खासगीकरण करणेच योग्य आहे. म्हणून महापालिकेने खासगीकरणासाठी निविदा मागविल्या; परंतु त्यास प्रतिसाद मिळत नसल्याने खासगीकरणासमोरही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.त्यामुळे कचरा संकलनासाठी नव्याने यंत्रणा उभी करायची की खासगीकरणासाठीच्या अटी शिथिल करायाच्या अशा द्विधा मनस्थितीत महापालिका प्रशासन सापडले आहे.


प्रिंट काढा