Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत   Deshdoot Times
 जि.प.,पं.स.साठी आज मतदान    मनपाच्या चाळीस उमेद्वारांना नोटिसा   Updated on February 7, 2012, 01:36:34 hrs



मुख्य पान | महापालिका शाळेत ई-लर्निंग
महापालिका शाळेत ई-लर्निंग
अहमदनगर, दि. २ (प्रतिनिधी)(03-February-2012)
Tags : Ahmednagar,Municipal School, E learning, Mayor Sheela shinde
 

अहमदनगर, दि. २ (प्रतिनिधी) - महापालिकेच्या शाळा क्रमांक १७ मध्ये आज ई-लर्निंग सुरू करण्यात आले. महापौर सौ. शीला शिंदे यांच्या हस्ते या ई-लर्निंगचे उदघाटन करण्यात आले. यावेळी आयुक्त संजय काकडे, शिक्षण मंडळाचे प्रशासक शिदोरे आदी उपस्थित होते. महापौर सौ. शिंदे म्हणाल्या, की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी संगणकीय शिक्षण आता गरजेचे झाले आहे. आजच्या काळाची गरज ओळखून सुरू करण्यात आलेल्या ई-लर्निंगबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आयुक्त संजय काकडे यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देताना, एकदा वाचन केल्यानंतर पुन्हा दुसर्‍यांदा २४ तासांनी वाचन केल्यास स्मरणात राहते, असे सांगितले. त्यासाठीच ही शिक्षण पद्धती महापालिकेच्या शाळेत सुरू करण्यात आली असून महापालिकेमार्फत १० संगणक संच देण्यात येणार आहेत, असे अश्‍वासन त्यांनी यावेळी दिले.


प्रिंट काढा