Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 आयसीसीची स्पॉटफिक्सर खेळाडूंवर तात्पुरती बंदी   वाळूतस्करांना दणका; 5 कोटींचा दंड!   पोलिसांचे धरपकडसत्र; 9 आरोपी जेरबंद   जवळकेत शेतकरी आत्महत्या   मास्टरब्लास्टर झाला हवाई दलाचा ग्रुप कॅप्टन   पिंपरीत एकतर्फी प्रेमातून तरुणीचा खून   सोनिया कॉंग्रेसच्या ‘विक्रमी’ अध्यक्षा   अपहृत पोलिसांच्या शोधासाठी मोहीम तीव्र   Updated on September 4, 2010, 20:04:27 hrs

मुख्य पान | कॅलिस, आमलाचा भारतीय गोलंदाजीवर हमला
कॅलिस, आमलाचा भारतीय गोलंदाजीवर हमला
नागपूर, दि. 6 (वृत्तसंस्था)(07-February-2010)
Tags : Ahmednagar,International,Sports
 

- जॅक कॅलिस आणि हाशिम आमला यांनी केलेल्या 285 धावांच्या भागीदारीमुळे भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या दिवसअखेर मजबूत स्थितीत पोहोचला. सकाळच्या सत्रात झहीर खानने घेतलेल्या दोन विकेट वगळता भारतीय गोलंदाजांना कोणतेही यश पहिल्या दिवशी मिळाले नाही. नागपूर येथील जामठा स्टेडियमवर आजपासून सुरू झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमस्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय झहीर खानने चुकीचा ठरविला. झहीर खान सलामीवीर ऍश्वेल प्रिन्स आणि ग्रॅमी स्मिथ लागोपाठ बाद करीत दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीलाच दोन धक्के दिले. सलामीवीर ए.प्रिन्सला शून्यावर बाद करून आफ्रिकेला झहीरने पहिला धक्का दिला. त्यानंतर कर्णधार ग्रॅमी स्मिथ याला सहा धावांवर बाद करून आफ्रिकेची अवस्था दोन बाद सहा अशी झहीरने केली. परंतु यानंतर सामन्याचे चित्र पालटले. जॅक कॅलिस आणि हाशिम आमला यांनी सावधपणे फलंदाजी करीत भारताचा फिरकी व वेगवान गोलंदाजांचा मारा यशस्वीपणे खेळून काढला. दोघांनी आपली शतकही पूर्ण केली. त्यानंतर जॅक कॅलिसने दीडशतकी टप्पा गाठला. दिवसअखेर आफ्रिकेने दोन बाद 291 धावा करून आपली बाजू भक्कम केली. कॅलिस 159 तर आमला 115 धावांवर नाबाद होते. आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात वृद्धिमान साहा आणि एस. बद्रिनाथ यांचा समावेश करण्यात आला आहे. दुखापतग्रस्त व्ही.व्ही. एस. लक्ष्मणऐवजी एस. बद्रिनाथला तर रोहित शर्माच्या जागी वृद्धिमान साहाला संधी देण्यात आली. लक्ष्मण अजूनही बोटाला झालेल्या दुखापतीतून बरा झालेला नाही तर रोहित शर्माला आज सकाळी सरावाच्या वेळी दुखापत झाली. राहुल द्रविड आणि युवराजसिंग हे या कसोटीत खेळणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाल्याने भारतीय फलंदाजीची मध्यमफळी कमकुवत झाल्याचे मानण्यात येत आहे. त्यामुळे नंबर वनच्या लढाईत भारतीय फलंदाजीची भिस्त आता गौतम गंभीर, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, कर्णधार धोनी यांच्यावरच आहे. तर कसोटी पदार्पणात चमकदार कामगिरी करण्याचे आव्हान वृद्धिमान साहा आणि बद्रिनाथ यांच्यासमोर आहे.


प्रिंट काढा