Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत   Deshdoot Times
 स्पर्धेतून पोलीस दलाची कार्यक्षमता वाढणार : ना. चव्हाण   रेल्वेतून पडून युवकाचा मृत्यू   राष्ट्रवादीतर्फे आठवलेंना महापौरपदाची ऑफर   जगभरात ४६ पत्रकारांच्या हत्या   Updated on February 23, 2012, 07:35:32 hrs



मुख्य पान | सोन्याच्या बदल्यात इंधन
सोन्याच्या बदल्यात इंधन
नवी दिल्ली, दि. २७ (वृत्तसंस्था) - (13-February-2012)
Tags : National,Economic news, Gold, Fuel,
 

नवी दिल्ली, दि. २७ (वृत्तसंस्था) - अमेरिका आणि युरोपीयन देशांच्या इराणवरील आर्थिक निर्बंधांमुळे विचलीत न होता काहीही करून आपण इराणकडून इंधन तेल मिळवूच असा निर्धार भारताने व्यक्त केला आहे. भारताच्या एकूण तेल आयातीमध्ये इराणच्या तेलाचा वाटा तब्बल १२ टक्के आहे. अमेरिका व युरोपीय समुदायाने इराणच्या अणूकार्यक्रमाचा विरोध करताना इराणवर आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्यानुसार सध्याची डॉलरच्या माध्यमातून इराणला पैसे देण्याची यंत्रणा कुचकामी ठरण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंधांचे पालन करताना कदाचित सोने देऊन त्याबदल्यात कच्चे तेल घेण्याचा मार्ग भारत अवलंबेल असे इस्त्रायलच्या एका संकेतस्थळाने म्हटले आहे. या वृत्तात तथ्य असल्याचे भारत सरकारने स्पष्ट केले नसून, हा एक मार्ग असल्याचे सरकारी अधिकार्‍यांनी सांगितले. अशाप्रकारे वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करण्यात येईल परंतु इराणचे तेल आपण विकत घेऊच असा निर्धार भारताने व्यक्त केला आहे. इराणवरील निर्बंधांमुळे आंतरराष्ट्रीय समुदायाला इराणचे तेल विकत घेणे कर्मकठीण होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोन्याच्या बदल्यात तेल विकत घेणारा भारत हा पहिलाच देश ठरणार असल्याचे इराणच्या अधिकार्‍यांनी देबका डॉट कॉम या इस्त्रायली संकेतस्थळाला सांगितल्याचे वृत्त आहे. गेल्या आठवड्यात भारतीय सरकारी अधिकारी इराणला भेट देऊन आले असून, त्यावेळी हा तोडगा काढण्यात आल्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या बाबतीत चीनही भारताचे अनुकरण करण्याची शक्यता आहे. इराणच्या मध्यवर्ती बँकेच्या मालमत्तेवर टाच आणत आर्थिक निर्बंध घातले गेल्याने इराणबरोबर डॉलरमध्ये आर्थिक व्यवहार करणे शक्य होणार नसल्याने अशा पर्यायांचा विचार होत आहे. एकूण तेल आयातीपैकी तब्बल १२ टक्के वाटा एकट्या इराणमधील तेलाचा असल्याने भारतासाठी ही आयात अत्यंत महत्त्वाची आहे. जर इराणच्या तेलाचा भारताला होणारा पुरवठा खंडित झाला तर भारतामध्ये इंधनाची टंचाई निर्माण होऊ शकते.


प्रिंट काढा