|
|
|
|
| मुख्य पान | संसदेपेक्षा जास्त अधिकार ग्रामसभांना मिळावेत |
| संसदेपेक्षा जास्त अधिकार ग्रामसभांना मिळावेत |
|
| नवी दिल्ली, दि. २७ (वृत्तसंस्था) (13-February-2012) |
Tags : National,Government news, Anna Hazare, Lokpal bill, Anna agitation,
Anna Hazare, Anna video message, Anna Hazare for law to
empower gram sabhas; threatens fresh stir |
नवी दिल्ली, दि. २७ (वृत्तसंस्था) - राज्यसभेमध्ये लोकपाल विधेयक मंजूर न झाल्याने भ्रमनिरास झालेल्या अण्णा हजारे यांनी आता संसदेपेक्षा जास्त अधिकार ग्रामसभांना मिळायला हवेत अशी वेगळीच मागणी केली आहे.
टीम अण्णानी आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्हिडीयो रेकॉर्डिंगच्या माध्यमातून मार्गदर्शन करताना अण्णांनी सांगितले, की लोकसभेतील सदस्यांना वाटते, की ते जनतेपेक्षा मोठे आहेत, पण लोकांनी त्यांना ़निवडले असल्याने संसदेपेक्षा जनता मोठी आहे. ५५० लोकसभेचे सदस्य स्वतःची मते मांडतात पण कोणीही लोकांना विचारत नाही. त्यामुळे आपल्याला नव्या कायद्याची गरज आहे आणि त्यानुसार ग्रामसभा या लोकसभा व राज्यसभेपेक्षा मोठ्या असल्या पाहिजेत असे ते म्हणाले. खर्या लोकशाहीमध्ये संसदेतील सदस्यांनी स्वतःची मते मांडणे अभिप्रेत नसल्याचे ते म्हणाले. ग्रामसभा या सर्वात जास्त सक्षम असाव्यात याचे उदाहरण देताना अण्णा म्हणाले, की विशेष आर्थिक क्षेत्र घोषित करताना गावाच्या मालकांना, ग्रामसभांना माहितीही नसताना सरकार परस्पर जागा ठरवते. जनता ही मालक आहे आणि ती झोपली असेल तर नोकर तिजोरी लुटतात असा प्रकार घडत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे ग्रामसभेच्या हाती सर्वाधिकार हवेत आणि ती संसदेपेक्षा वरच्या स्थानावर असावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सरकारने कायदे करताना लोकांची मते विचारात घेतली पाहिजे आणि ते सध्या घडत नसल्याचे मत नोंदवले. |
प्रिंट काढा |
|
|
|