|
| नाशकात सेना-भाजप युती तुटली |
|
| nashik(13-February-2012) |
Tags : Nashik,Maharashtra,shivsena-BJP alliance, MNC election 2012 |
गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाचे शहराध्यक्ष महापालिकेसाठी शिवसेनेसोबत महायुती करण्यास नाखूश होते.त्याचाच परिणाम म्हणून नुकत्याच मुंबईत दोन्ही पक्षांच्या झालेल्या बैठकीत शिवसेना-भाजपाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे नाशकात महायुतीला ब्रेक लागला आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी मुबंईत ही घोषणा केली. ते म्हणाले की, दोन्ही पक्षाच्या स्थानिक पदाधिकार्यांमध्ये जागा वाटपाबाबत एकवाक्यता नाही. तसेच दोन्ही पक्षातील काही इच्छुकांच्या पुनर्वसनाचाही प्रश्न आहे.शिवसेना आणि भाजपात निवडणूकपूर्व युती होणार नाही मात्र निवडणूक झाल्यानंतर दोन्ही पक्ष सत्तास्थापनेसाठी एकत्र येऊ शकतील. दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार असले तरी मित्रपक्षावर आघात होईल असे कोणतेही कृत्य केले जाणार नाही. दोन्ही पक्षांच्या पदाधिकार्यांना शहरातील आपली राजकीय ताकद वाढल्याचे वाटत असले तरी दोन्ही पक्षांचे मूळ ध्येय कॉंग्रेस-राष्ट्रवादीला नेस्तनाबूत करणे हेच राहील असे मुनगंटीवार म्हणाले.
शिवसेना-भाजपाच्या पदाधिकार्यांमध्ये जी बैठक झाली त्यावेळी भाजपाच्या वतीने महापालिकेसाठी ९२ जागांची मागणी (पान १२ वर)
|
प्रिंट काढा |
|
|
|